श्रीरामपुरातील आदर्श लॉजला ठोकले टाळे;अनैतिक देह व्यवसायामुळे वर्षभर बंदीची कारवाई

श्रीरामपूर-शहरातील आदर्श लॉजवर पोलिसांनी कडक कारवाई करत एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश काढले आहेत.त्यानुसार पोलीस स्टेशनकडून सदर लॉज सिल करण्यात...

श्रीरामपूर-
शहरातील आदर्श लॉजवर पोलिसांनी कडक कारवाई करत एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश काढले आहेत.त्यानुसार पोलीस स्टेशनकडून सदर लॉज सिल करण्यात आले असून पोलीस प्रशासनाने सामाजिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दिनांक ०४/०९/२०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना  शहरात आदर्श लॉज येथील मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले हा मुलींना पैशाचे अमिष देवून देहव्यापारास प्रवृत्त करुन सदर लॉजवर जागा उपलब्ध करुन देत कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पो.नि. नितीन देशमुख यांनी पोलीस पथक तयार करुन बनावट ग्राहक तसेच दोन पंचासह सापळा रचत कारवाई केली असता तेथे धीरज प्रमोद बिंगले, वय ३५ वर्ष, धंदा मॅनेजर आदर्श लॉज, रा. रंगोली रोड, वार्ड क्रं.५, श्रीरामपुर हा मिळुन आला. तसेच सदर लॉज मध्ये ३ पिडीत महिलाही मिळून आल्या. सदर मॅनेजर व त्याचा साथीदार अहमद शेख, रा. बाबरपुरी, वार्ड नं.२, श्रीरामपुर (फरार) हे सदर महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे तपासात समजले. यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक ०४/०९/२०२५ रोजी गु.र.नं. ८२३/२०२५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात अजुन चार आरोपी निष्पन्न झाले आहेत. सदर लॉजचे चालक गुन्हयातील पिडीत महिला यांना पैश्याचे अमिष दाखवुन त्यांचे कडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन अनैतिक देह व्यापारातुन मिळणारा पैसा स्वतःकडे घेत असतात. त्यामुळे सदर गुन्हयात त्यांना आरोपी करण्यात आले आहे. यापुर्वी देखील सदर लॉजवर दि.१०/०१/२०२४ रोजी छापा टाकण्यात आला होता.पोलीस प्रशासनाच्या असे निदर्शनास आले की, सदर हॉटेल चालक व मालक यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने तसेच सदर लॉज हे धार्मिक स्थळ श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिंगबर जैन मंदिर, गणपती मंदिर आणि नुराणी मस्जिद या सार्वजनिक व धार्मिक स्थळापासुन नजीकच आहे म्हणून आदर्श लॉजचे चालक व मालक यांचे विरोधात सक्त पाऊल उचलणे गरजेचे असल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांचेकडे  लॉजचा परवाना रदद करणेबाबत प्रस्ताव सादर केला होता.त्यावरुन जिल्हाधिकारी  यांनी उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपुर भाग श्रीरामपुर यांना उचित कारवाई करण्याचे निर्देष दिले होते.  दिनांक ०९/०२/२०२६ रोजी आदर्श लॉज रंगोली रोड, वॉर्ड क्रं.५, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर हे एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यानुसार पोलीस स्टेशनकडून सदर लॉज सिलबंद करण्यात आले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!