अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी;श्रीरामपूरच्या शिक्षकाकडून महिलेने उकळले 3 लाख

श्रीरामपूर-अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत महिलेने श्रीरामपूर येथील शिक्षकाकडून 3 लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.याबाबत...

श्रीरामपूर-
अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत महिलेने श्रीरामपूर येथील शिक्षकाकडून 3 लाख रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.याबाबत या शिक्षकाच्या फिर्यादीवरून सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेने गोड गोड बोलून या शिक्षकाची सर्व माहिती काढून घेत त्याच्याशी सतत मोबाईवर संपर्कात राहत नंतर अत्याचाराच्या गुन्ह्याची धमकी देत १० लाख रुपयांची मागणी त्या शिक्षकाकडे केली. त्यातील ३ लाख रुपये या शिक्षकाने भितीपोटी सदर महिलेला दिलेही होते.
याबाबत फिर्यादी महेश लहू कोल्हे, रा.उत्सव मंगल कार्यालय रोड, वॉर्ड नं.७, श्रीरामपूर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण क्रिडा शिक्षक असून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी येणाऱ्या मुलांना श्रीरामपुरातील एका लॉज येथे थांबवत असतो. सप्टेंबर २०२४ मध्ये क्रिडा स्पर्धेकरीता आलेल्या विद्यार्थ्यांना आपण या लॉजवर थांबवले होते. तेथे मला संबंधित महिला भेटली. तिने आपला मोबाईल नंबर घेवून आपल्याशी मैत्री केली.आपली नोकरी, कौटुंबिक तसेच आर्थिक स्थितीबाबत माहिती तिने काढून घेतली. सदर महिलेशी आपण फोनवर बोलायचो मात्र तिला कधीही एकांतात भेटलो नाही. ऑक्टोबर २०२५ पासून अचानक सदर महिला आपल्याला १० लाख रूपयांची मागणी करू लागली. तेव्हा मी पैसे का देऊ? असे म्हटल्याने त्याचा राग येवून तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून मी तुला जेलमध्ये बसवेन, तुझ्या परिवाराची बदनामी करेल, असे तिने धमकावले.
दरम्यान बदनामीच्या भितीने आपण घरातील सोने गहाण ठेवून या महिलेस २ लाख रूपये रोख स्वरूपात दिले. तेव्हा सदर महिला काही करणार नाही असे वाटले. परंतु नोव्हेंबर २०२५ मध्ये रात्री आपल्या घराजवळ येवून आरडाओरडा करून सदर महिलेने दगडफेक केली व वडीलांना दम दिला. तेव्हा आपल्या वडीलांनी शहर पोलिसात तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा या महिलेने घरी येऊन गोंधळ घातला. तेव्हा पुन्हा घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. पुन्हा या महिलेने गोंधळ करू नये म्हणून तिला आपण आणखी १ लाख असे एकूण आतापर्यंत 3 लाख रूपये दिले. सदर प्रकारामुळे आपण गोंधळलेलो असताना आपल्याला समजले की सदर महिलेने यापूर्वीही एका इसमाशी अशीच ओळख करून त्याच्याविरोधातही श्रीरामपूर कोर्टामध्ये बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंतर या महिलेने तडजोड करून केस मागे घेतली. त्यामुळे आपल्याही विरोधात ही महिला खोटा गुन्हा दाखल करेल, अशी भिती वाटल्याने आपण पोलिसात सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर फिर्यादीवरून पोलिसांनी त्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. जाधव हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!