श्रीरामपूरात बसणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा;नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

श्रीरामपूर-छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहरात बसविण्याबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली.सदरचा पुतळा शहरातील संगमनेर रोडवरील स्व. खा.गोविंदराव आदिक सभागृह समोरील...

श्रीरामपूर-
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहरात बसविण्याबाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली.सदरचा पुतळा शहरातील संगमनेर रोडवरील स्व. खा.गोविंदराव आदिक सभागृह समोरील जागेत बसविण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करण्यात आला.यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी चर्चा करून आदिक सभागृहासमोरच पुतळा बसविण्याची जागा योग्य आहे,यावर एकमत करत पुतळा बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या कारकिर्दीतील पहिली सर्वसाधारण सभा काल पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली.सभेतील सर्व विषय साधक बाधक चर्चेनंतर सर्वानुमते मंजूर करण्यात आले.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करण ससाणे होते.व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कांचन सानप व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर साडेअकरा वाजता सुरू झालेली ही सभा तीन वाजता संपली.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शहरात बसविण्याबाबत या सभेत सर्वाधिक चर्चा झाली.नगरसेवक दीपक चव्हाण व वैशाली चव्हाण यांनी हा पुतळा एका बाजूला न बसवता हमरस्त्यावर बसवला पाहिजे असे सांगून बेलापूर रोडवर असलेल्या वेशीच्यावर संभाजी महाराजांचे मुर्ती बसवावी किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवावा अशी मागणी केली. नगरसेवक श्रीनिवास बिहानी यांनी सदर पुतळा थत्ते ग्राउंड जवळ बसवण्याची मागणी केली.यावर नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले की माझी स्वतःची इच्छा आहे की शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे.शिवाजी महाराज चौकात तो बसविता येईल का याचा आपण अभ्यास करू.या प्रश्नावर राजकारण कोणीही करू नये. विनाकारण वादाचा विषय केल्यास हा विषय लांबेल. यासंदर्भात आशिष धनवटे, संजय गांगड, मुजफ्फर शेख,दिलीप नागरे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
पालिकेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांनी शिफारशी केलेल्या ठरावांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या बाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला असून रेल्वे स्टेशन समोरील जागेत त्यांचा पुतळा १४ एप्रिल पूर्वी बसविण्याचा मानस असल्याचे नगराध्यक्ष ससाणे यांनी यावेळी सभेत सांगितले.

शहरातील अतिक्रमण मोहिमेत विस्थापित झालेल्या लोकांना गाळे व जागा देण्याबाबत शासनाच्या विविध ठिकाणी असलेल्या शासकीय जागांची मागणी आपण केली असून या जागा मोफत मिळविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत प्रयत्न करण्याचे ठरले.पाटबंधारे खात्याच्या हद्दीतील जागा पालकमंत्री विखे पाटील यांच्या खात्याअंतर्गत येत असल्याने सदर जागेची मागणी सुद्धा करण्याची ठरले.
यावेळी विस्थापित पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी गॅलरीतून घोषणा दिल्याने नगराध्यक्ष ससाणे यांनी त्यांना घोषणाबाजी न करण्याचे आवाहन केले.
नगरपालिके मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध व्याख्यानमाला तसेच वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार याबाबत अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असून त्यानंतर या व्याख्यानमाला चालू करण्यात येतील असे सांगण्यात आले.माजी आमदार जयंत ससाणे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्याची मागणी नगरसेविका प्रणिती चव्हाण यांनी केली तर माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्याची मागणी दीपक चव्हाण व वैशाली चव्हाण यांनी केली. तसेच वसंतराव देशमुख पुरस्कारासोबतच पत्रकार अशोक तुपे यांच्या नावाने पुरस्कार देण्याची मागणी प्रणिती चव्हाण यांनी केली.
माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे तैलचित्र अनावरण करण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
शहरात लावले जाणारे फ्लेक्स बोर्ड ची जागा निश्चित करून त्यासाठी नियमावली तयार करण्याचे ठरविण्यात आले तसेच विनापरवानगी बोर्ड लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ देतानाच शहराला स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे.प्रसार माध्यमात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने शहरातील पाणीपुरवठा बाबत जोरदार चर्चा झाली.श्रीनिवास बिहानी यांनी मोरगे वस्तीवर येणारे घाण पाण्याचे व्हिडिओ सभागृहात दाखवले तर प्रसार माध्यमात आलेली बातमी ही अर्धवट माहिती वर आधारित असून संपूर्ण कॅनॉलची पाहणी केली असता कुठेही गटारीचे पाणी पाटात मिसळलेले नाही असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.पाण्याचे रोटेशन येण्यापूर्वी कॅनालची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक स्नेहल खोरे यांनी केली.

पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा करताना शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनची तपासणी करून अशा नळ कनेक्शन धारकांना एक महिन्याची नोटीस देऊन त्यांनी आपले कनेक्शन नियमित करून घ्यावे. त्यासाठी पाच हजार रुपये शास्ती भरावी असे सांगून जे नळ कनेक्शन धारण याबाबत प्रतिसाद देणार नाही त्यांच्यावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केले.
या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाच्या वतीने नगरसेवक व गटनेते मुजफ्फर शेख,अंजुमभाई शेख,दिलीप नागरे,मंजुश्री मुरकुटे,संतोष कांबळे,राजेंद्र पवार,प्रणिती चव्हाण,डॉ. दिलीप शिरसाट,यांनी तयार विरोधी भाजपा तर्फे गटनेत्या वैशाली चव्हाण,दीपक चव्हाण,श्रीनिवास बिहानी,आशिष धनवटे,संजय गांगड,आकाश बेग,जितेंद्र छाजेड,स्नेहल खोरे आदींनी सहभाग घेतला.

शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
पालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर तासाभरातच शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची पोस्ट पालिका प्रशासन तर्फे सोशल मीडियावर टाकण्यात आली.पालिकेच्या नवीन साठवण तलावाचे काम सुरू असल्याने पाणी साठवण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जुन्या तलावात 30 दिवस पुरेल इतकेच पाणी असते पिण्याचे पाण्याचे रोटेशन पाठवणाऱ्या मार्फत खात्यामार्फत कधी येईल हे निश्चित असल्याने आहे ते पाणी महिनाभर पुरवण्याच्या दृष्टीने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला असून ६, ८, १०, १२, १४ अशा सम तारखांना शहराला दिवसा आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!