श्रीरामपूर- शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये मैलामिश्रित, दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ शहानिशा करून वस्तुस्थिती समोर आणावी, जर खरोखरच श्रीरामपूरकरांना मैलामिश्रित गटारीचे पाणी पिण्यासाठी दिले जात असेल तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत असल्याची लेखी हमी द्यावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोलप यांनी पुढील २४ तासात या प्रकरणाची शहानिशा करून योग्य त्या कार्यवाहीची ग्वाही भाजप पदाधिकाऱ्यांना दिली. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही अन्यथा सर्वसाधारण सभेत हा मुद्दा सोडविल्याशिवाय कामकाज सुरू करू देणार नाही,असा इशारा भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण व स्थायी समिती सदस्य आशिष धनवटे यांनी दिला. हा विषय कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा नसून थेट श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने शहानिशा करून कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड व भाजपचे सरचिटणीस केतन खोरे यांनी मांडली. पिण्याच्या पाण्यात मैला सोडण्याचे घाणेरडे कृत्य धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणा दूर करण्याची मागणी नगरसेवक संजय गांगड व रवी पाटील यांनी केली. सहा महिन्यांपूर्वी अशी घटना घडली असून याबाबत पुढे काय झाले ? शाश्वत उपाय कधी काढणार ? असे अनेक प्रश्न माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दिपक चव्हाण यांनी उपस्थित केले.
सदर व्हायरल व्हिडिओची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, साठवण तलाव आणि पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करावी, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, दोषी आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत असल्याची लेखी हमी द्यावी अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिला भाजप महिला शहराध्यक्षा स्वाती चव्हाण, नगरसेवक मनोज लबडे, पुजा चव्हाण, विशाल अंभोरे, अर्जुन कर्पे, रुपेश हरकल, बाळासाहेब हरदास, अमोल शेटे, प्रतीक वैद्य, सुभोत शेवतेकर, प्रशांत शितोळे, सचिन (मन्नू) धोत्रे, राहुल फुलारे, नवनाथ पवार, किरण पठारे, अवधूत शिंदे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, अजय छल्लारे, किरण कर्नावट, अनिल खंडागळे, सचिन पवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्न राजकारणाचा नसून श्रीरामपूरकरांच्या आरोग्याचा..! श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या पाण्यात मैला मिश्रित दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी सोडण्यात आल्याच्या व्हायरल व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि खरच श्रीरामपूरकरांना मैलामिश्रित गटारीचे पिण्याचे पाणी येत असेल तर दोषींवर कडक कारवाई करावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येऊन हा प्रश्न राजकारण करण्याचा नाही तर श्रीरामपूर करांच्या आरोग्याचा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी