श्रीरामपूर शहरातील रेल्वे ओव्हरब्रीज परिसर बनला मृत्यूचा सापळा;अपघात थांबवण्यासाठी लहुजी सेनेचे उपोषण

श्रीरामपूर-श्रीरामपूर–नेवासा राज्यमार्गवरील शहरात नजीक असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकांचे नाहक बळी गेले आहेत वारंवार होणाऱ्या या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर–नेवासा राज्यमार्गवरील शहरात नजीक असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकांचे नाहक बळी गेले आहेत वारंवार होणाऱ्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सोमवार दिनांक ०२ पासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.यापूर्वी या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाला निवेदन देऊन वेळ दिला होता. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिज हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून येथे वारंवार गंभीर अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, सूचना फलक, रस्त्याची दुरुस्ती तसेच वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या उपोषणामध्ये भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाऊ पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेबजी बागुल, राजेंद्र त्रिभुवन, अल्ताफ शेख, रमिज पोपटिया, नंदकुमार बागडे, सिकंदर तांबोळी, रमजान शेख, हाजी गफार शेठ पोपटिया, सलीम मेमन, मच्छिंद्र साळुंखे, संदीप शेठ शेडगे, राज्यू भाऊ कडू, तात्यासाहेब सोनवणे, सतीश लोखंडे, मेहमूद पठाण, नागेश साथे, सलमान पठाण, अण्णा कुऱ्हाडे, रोहन परदेशी, सागर चापनेरकर तसेच रज्जाक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
या उपोषणाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी भेट देऊन सह्या करत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा कडक इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महिला व मागच्या आठवड्यात कार्तिक भंडारी नावाचा तरुण विद्यार्थी यांचा बळी या ओव्हर ब्रीजवरील वाहतूक गैरव्यवस्थेमुळे अपघात होवुन गेल्याने नागरिकांकडुन या आंदोलनाचे स्वागत करण्यात येत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!