कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा;महिलेची सुटका, मॅनेजरला अटक

श्रीरामपूर-अकोले तालुक्यातील शेकईवाडी येथील हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत...

श्रीरामपूर-
अकोले तालुक्यातील शेकईवाडी येथील हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दि. २९ जानेवारी रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे देहव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पंचासमक्ष लॉजवर छापा टाकला. छाप्यादरम्यान लॉजच्या पहिल्या मजल्यावरील काऊंटरवरून सुनिल शांताराम शिंदे (वय ४५, रा. शेकईवाडी, ता. अकोले) यास ताब्यात घेण्यात आले. तो हॉटेलचा मॅनेजर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पाहणीदरम्यान रूम क्रमांक २ मध्ये एक महिला आढळून आली. चौकशीत संबंधित महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी सदर महिलाची सुटका केली असून हॉटेल मॅनेजरविरुद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नोंदविण्यात आला असून या प्रकरणात हॉटेल मालकासह अन्य आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील तसेच अकोले पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!