सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’धोरण;३४ जणांविरुध्द हद्दपारीचे प्रस्ताव

श्रीरामपूर-आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्याच्या अनुषंगाने...

श्रीरामपूर-
आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्याच्या अनुषंगाने ३४ जणांविरुद्ध हद्दपारी प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हयात सराईत गुन्हे करणा-या व्यक्ती टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील  सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्दपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार व्यक्ती / टोळीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असुन त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले आहे.त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये श्रीरामपुर विभागातील (अहिल्यानगर उत्तर जिल्हा) १७ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील मागील १० वर्षांतील (२०१६ ते २०२५) सर्व गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राईम डेटाबेस’ तयार केला आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ तसेच नवीन फौजदारी कायदयाचे तरतुदी नुसार गुन्हेगारांवर अधिक कडक आणि जलद कारवाई केली जात आहे. क्राईम डेटाबेसमुळे तपासाची गती वाढणार असून, कोणताही आरोपी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकणार नाही. नवीन कायद्यांमधील तरतुदींचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा डेटाबेस ‘कणा’ ठरणार आहे. सदरचा Crime Data हा केवळ एका पोलीस स्टेशन पुरता नसुन पुर्ण अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचा गुन्हे रेकॉर्ड यात संकलित केला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याचेवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करणे शक्य होणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!