श्रीरामपुरात पत्नीकडून पतीचा गळा आवळून खुन;पोलिसांच्या तपासाने गुढ उकलले

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्याडोक्यात लाकुड मारत गळा आवळुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.सदर महिलेचा पती हा दारु पिवुन मारहाण...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील दत्तनगरमध्ये पत्नीने पतीच्या
डोक्यात लाकुड मारत गळा आवळुन खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.सदर महिलेचा पती हा दारु पिवुन मारहाण करत तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता.या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलत पतीचा खून केला.पोलिसांच्या तपासात महिलेने खून केल्याची कबुली दिली असून रश्मिता मानसकुमार शाहु असे या आरोपी महिलेचे नाव आहे.
याबाबत पोकॉ कैलास तुकाराम झिने, वय- ५० वर्षे, नेमणुक-श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,दि.२४ रोजी दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी एक व्यक्ती मृत झालाअसल्याबाबत कळवले. त्यावरुन मी सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता प्रथमदर्शनी मृताच्या डोक्याला मार लागलेला व त्यातुन रक्त निघाल्याचे दिसले.तसेच त्याच्या गळयावर उजव्या बाजूला काळया रंगाचा व्रण दिसला.अधिक चौकशी केली असता सदरचे घर विजु पटाट यांचे असुन त्यांचे घरी मानसकुमार शाहु हे भाडोत्री राहत असल्याचे समजले.तेथेअसलेल्या रश्मिता मानसकुमार शाहु हिच्याकडे चौकशी केली असता तीने मृत व्यक्ती हा तिचा पती असल्याचे सांगुन त्याच्या मृत्यू बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ती मृत व्यक्तीला हॉस्पीटलमध्ये घेवुन जाण्यास नकार देत तात्काळ अंत्यविधी करण्याचा आग्रह धरत होती.त्यावर मी मृतदेह साखर कामगार हॉस्पीटल येथे घेवुन गेलो.तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास उपचारापुर्वीच मयत घोषीत केले.सदर घटनेबाबत पो.नि.नितीन देशमुख यांना सविस्तर माहिती कळवत याबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आ.मृ नं १०/२०२६ बी.एन.एस.एस कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांनंतर मृतदेहाचे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे शवविच्छेदन करण्यात आले.सदर व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याची पत्नी रश्मिता मानसकुमार शाहु हिचेकडे पो.नि देशमुख, सपोनि जाधव यांनी तिला विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता तिने माझा पती मानसकुमार शाहु हा दारु पिवुन मला खूप मारहाण करत असे व सतत संशय घेत असे. त्यामुळे मी त्याच्या डोक्यात आंब्याचे झाडाचे लाकुड मारुन व गळा आवळुन मारुन टाकल्याची कबुली दिली.त्यामुळे बी.एन.एस १०३(१) प्रमाणे मृताची पत्नी रश्मिता शाहू हिच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
            

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!