श्रीरामपुरातील समस्या तात्काळ सोडवा;नगराध्यक्ष ससाणे यांच्याकडे मनसेची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य व इतर प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगराध्यक्ष करण ससाणे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य व इतर प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना करा अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  नगराध्यक्ष करण ससाणे यांच्याकडे करण्यात आली.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की,
श्रीरामपूर बाजारतळ येथे असलेल्या उद्यानामध्ये नागरिकांच्या व्यायामासाठी साहित्य बसवून संपूर्ण उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करून जनतेच्या सुविधासाठी ते खुले करण्यात यावे.शहरातील सर्व नाल्या व गटारी रोजच्या रोज साफसफाई करण्यात यावी. शहरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे व तसेच जुने असलेल्या सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी. शहरातील रस्ते नव्याने करण्यात यावेत व खराब रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत.शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या इमारत मालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी तसेच ज्यांनी पार्किंगची जागा दाखवून इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे व प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केली नाही अशा इमारत बांधकाम मालकावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.निवेदन देते प्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, शराध्यक्ष सतीश कुदळे,नितीन जाधव रोजगार सेना तालुकाध्यक्ष, मनसे श्रीरामपूर तालुका प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल ठोंबरे,आकाश साबळे  तालुका संघटक,मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष अरमान शेख, निलेश सोनवणे शहर संघटक, शहर चिटणीस मच्छिंद्र हिंगमिरे,आर्यन शिंदे मनसे शहर उपाध्यक्ष, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, रवी शिंदे,आदी पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!