माळवाडगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणारा टिप्पर पकडला; तिघा जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने माळवाडगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल...

श्रीरामपूर-
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने माळवाडगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोकॉ सतिष शंकर पठारे नेम,अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादित म्हटले की,
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दि. 24 रोजी पोना अनिल काशिनाथ शेंगाळे, पोकॉ सचिन दगडु शेळके, पोकॉ अनिकेत आण्णासाहेब बर्डे,पोहेकॉ आयुब बाबु शेख यांच्या पथकाने माळवाडगावकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या अडबंगनाथ संस्थान कमानीसमोर येथे सापळा लावला.सकाळी 6.30 वा. चे सुमारास आम्हाला भामाठाणच्या दिशेने एक टिप्पर येताना दिसला. आम्ही सदर वाहन चालकास थांबविण्याचा ईशारा केला असता त्याने पोलीस पथकास पाहून सदर टिप्पर रोडच्या थोड्या अंतरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. टिप्पर क्र MH 17 CV 1095 याच्यामध्ये वाळू मिळुन आली. दोघा जणांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव सुनिल छगन रजपुत वय 31 वर्षे रा. वाहेगाव मांजरी ता. गंगापुर जि. छ. संभाजीनगर व सागर भाऊसाहेब आसणे वय 29 वर्षे रा.माळवाडगाव ता. श्रीरामपुर असे सांगीतले.तसेच वाहन मालकाचे नाव  ज्ञानेश्वर देविदास बनसोडे रा.भामाठाण ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगीतले. त्याच्या सांगण्यानुसार आम्ही वाळु उपसा करत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर
7,00,000 रु किं.चा टिप्पर व 15,000 रु.किं.ची सुमारे दोन ब्रास वाळु असा एकूण7,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 303 (2), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!