जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला;गंभीर जखमी तरुणावर प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

श्रीरामपूर-जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील परिसरात घडली आहे....

श्रीरामपूर-
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील परिसरात घडली आहे. या हल्ल्यात सुनिल सोमनाथ औटी (वय २७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.दरम्यान श्रीरामपूर शहरात एकामागून एक घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांनी सर्वसामान्य नागरिक दहशतिच्या सावटाखाली जगत आहेत.पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांत असंतोष खदखदत आहे.
या घडलेल्या घटनेप्रकरणी मंगल सोमनाथ औटी (वय ४५, रा. स्वप्ननगरी, गोंधवणी वॉर्डन, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन लक्ष्मण बनसोडे (रा. नेहरूनगर, गोंधवणी) व त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये सुनिल औटी व सचिन बनसोडे यांच्यात मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यानंतर सचिन बनसोडे याने सुनिल याला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली होती. दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर सचिन बनसोडे व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने दुचाकी अथवा चारचाकी वाहनावरून येत सुनिल औटीवर चाकूने तोंडावर, पोटावर व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सुनिल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.घटनेनंतर त्याचे मित्र गौरव सोनटक्के व निखिल आवारे यांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला लोंणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास  पोलीस  करत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!