कोचिंग क्लासला विद्यार्थी जाणे हे शिक्षण संस्थांचे अपयश-पालकमंत्री विखे पाटील

श्रीरामपुर-बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे असून कोचिंग क्लासला विद्यार्थी जाणे हे शिक्षण संस्थांचे अपयश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा...

श्रीरामपुर-
बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे असून कोचिंग क्लासला विद्यार्थी जाणे हे शिक्षण संस्थांचे अपयश असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या जेटीएस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंके होते.यावेळी उपाध्यक्ष राजेश खटोड,सचिव ॲड शरद सोमाणी, दीपक सिकची, नंदुशेठ खटोड, बापूसाहेब पुजारी,रविंद्र खटोड, भरत साळुंके,श्रीवल्लभ राठी, चंद्रशेखर डावरे,ॲड.विजयकुमार साळुंके,नामदेव मोरगे,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,उपाध्यक्ष दीपक पटारे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,नानासाहेब पवार,गिरीधर आसने प्राचार्य दत्तात्रय पुजारी,उपप्राचार्य जयश्री घनकुटे,पर्यवेक्षक भानुदास खरात,कार्याध्यक्ष जनार्दन पुजारी, स्वागताध्यक्ष विवेक शिनगारे,विजय ताजने,विद्यार्थी प्रतिनिधी प्रणाली सराफ,वेदिका कर्पे,विद्या माळी,यजत शर्मा,रोहित बंगाळ,अभिषेक जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीमध्ये संस्थापक प्रेमसुखशेठ खटोड, मुरली शेठखटोड वासुदेव कोळसे यांचेसह अनेकांचे योगदान आहे. आजकाल विद्यार्थ्यांना फक्त पुस्तके शिक्षण दिले जाते. मात्र ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि विकासासाठी योगदान दिले अशा शास्त्रज्ञांसह क्रांतिकारकांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. आजचे शिक्षण हे परिपूर्ण शिक्षण आहे का याचा आत्मचिंतन करण्याची गरज शिक्षण संस्थांसह शिक्षकांची आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले पाहिजे. आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये फक्त घोकंपट्टी करून परीक्षेसाठी विद्यार्थी तयार केला जातो. ही पद्धत बदलण्याची गरज आहे. शाळेमध्ये शास्त्रज्ञासह देशाच्या विकासात योगदान असणाऱ्यांचे एक स्वतंत्र दालन असले पाहिजे .यापुढची पिढी तंत्रज्ञानाने परिपूर्ण पिढी असले पाहिजे विद्यार्थ्यांना काळानुरूप व्यवसायभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. आपण जामखेडला जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी गेलो असता त्या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट विज्ञानाची उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केलेली होते मात्र विज्ञान प्रदर्शनासाठी फक्त पाच लाखांचे अनुदान असल्याने विज्ञान प्रदर्शनात आयोजनात अनेक अडचणी येत असल्याचे समजल्यावर आपण हे अनुदान एक कोटी रुपयांचे केले.विद्यार्थ्यांमध्ये जगाबरोबर स्पर्धा करण्याची जिद्द जागवली पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर इंजिनीयर दडलेले आहेत. त्याचा विकास होण्यासाठी आणि जगाची स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थी तयार झाले पाहिजे.ते होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून चार हात दूर राहिले पाहिजे मोबाईलच्या नादामध्ये पालकांनाही विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे खंतही मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली. यावेळी ॲड शरद सोमाणी, भरत साळुंके यांचीही भाषणे झाली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष राजेश खटोड यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य दत्तात्रय पुजारी यांनी केले आभार रवींद्र खटोड यांनी मांडले तर सूत्रसंचालन नवनाथ कुताळ यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!