श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कांचन सानप;श्रीनिवास बिहाणी,अंजुम शेख,डॉ.शिरसाट व लिंगायत स्वीकृत नगरसेवकपदी

श्रीरामपर-श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कांचन सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसकडून अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाट...

श्रीरामपर-
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कांचन सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसकडून अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाट व गोपाल लिंगायत तर भाजपकडून अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले श्रीनिवास बिहाणी यांचीच निवड जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते. सभेत नगरपरिषद अधिनियमानुसार उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
उपनगराध्यक्षपदासाठी कांचन सानप यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
स्वीकृत सदस्यांची नावे काँग्रेस व भाजप पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाट व गोपाल लिंगायत, तर भाजपकडून श्रीनिवास बिहाणी यांची निवड करण्यात आली. सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी काँग्रेसचे गटनेते मुजफ्फर शेख, भाजपच्या गटनेत्या वैशाली चव्हाण यांच्यासह नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आमदार हेमंत ओगले यांनी निवड झालेल्या उपनगराध्यक्षा व स्वीकृत सदस्यांचा सत्कार केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!