श्रीरामपुरातील अतिक्रमणधारकांना न्याय देऊ-पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन;भाजपच्या नगरसेवकांनी घेतली ना.विखे यांची भेट

श्रीरामपुर-श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या ११ नगरसेवकांना विजयी केले.त्याबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करत श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी...

श्रीरामपुर-
श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या ११ नगरसेवकांना विजयी केले.त्याबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करत श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले.शहराला पाण्याची समस्या भेडसावू देणार नाही.अतिक्रमणधारकांना न्याय देण्याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाला ना.विखे यांनी आश्वस्त केले.
नगरपरिषेदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यात आलेली समस्या,कॅनॉल लाईनच्या अतिक्रमणधारकांना आलेल्या नोटीस यांसह विविध महत्वपूर्ण विषयांवर तोडगा काढावा म्हणून जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रीरामपूर शहरातील भाजप नेते व नगरसेवकांनी भेट घेतली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर नगरपरिषदेत भाजप पक्षाचे ११ नगरसेवक विजयी झाल्यानंतर शहरातील विकासकामांना गती मिळावी, दररोज होणार पाणीपुरवठा सुरळीत राहावा, शहरातील कॅनोल भूमिगत करून त्यावर अतिक्रमणधारकांना गाळे मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे पाटील यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपाध्यक्ष दीपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, केतन खोरे, रवी पाटील, नगरसेवक दीपक चव्हाण, श्रीनिवास बिहाणी, अर्जुन दाभाडे, संजय गांगड, आशिष धनवटे, शशांक रासकर, संजय छल्लारे, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, बंडूकुमार शिंदे संदीप चव्हाण, मारुती बिंगले, विजय पवार, अमोल शेटे, राजू यादव आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!