कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आ.हेमंत ओगले यांची नियुक्ती

श्रीरामपूर-महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून श्रीरामपूर – राहूरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांची नियुक्ती करण्यात आली...

श्रीरामपूर-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून श्रीरामपूर – राहूरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र अप्पर सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विशेष करून शेती विषयाबाबत महाराष्ट्रात नव्हे तर देशात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कृषी विद्यापीठावर आमदार ओगले यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर यांसारख्या तळागळातील घटकांसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला व मतदार संघातील अनेक महत्त्वपूर्ण विषय मुद्देसूतपणे मांडले. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नामदार राहुल नार्वेकर यांच्याकडून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची मोठी परंपरा असून यापूर्वी देखील अनेक मान्यवरांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेती, पशुसंवर्धन यामध्ये आधुनिक बदल घडवून त्याचा शेतकरी वर्गाला कसा फायदा होईल यासाठी कृषी विद्यापीठ हे नवनवीन प्रयोगासाठी प्रयत्नशील असते. आमदार ओगले यांच्या निवडी मुळे निश्चितच मतदारसंघाला फायदा होणार आहे.आमदार ओगले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.  नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे,  मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, गटनेते मुजफ्फर शेख, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!