श्रीरामपूर पुन्हा हादरले;बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार;गोळीबारात जहागीरदार गंभीर जखमी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील कॉलेजरोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असताना जर्मन हॉस्पिटल जवळ जहागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला.या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शहरातील साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिकच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घटनेनंतर बंटी जागीरदार समर्थकांचा मोठा जमाव साखर कामगार हॉस्पिटल समोर जमा झाला होता.मोटारसायकलवरुन आलेले हल्लेखोर कोण होते?कोणत्या कारणाने जहागीरदार यांच्यावर हा हल्ला करण्यात आला याचा पोलीस कसुन शोध घेत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!