काँग्रेसचे संपूर्ण बहुमत असलेली श्रीरामपूर एकमेव नगरपालिका-आ.ओगले;नगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्वीकारला पदभार
श्रीरामपूर-पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात श्रीरामपूरची नगरपालिकाअशी एकमेव नगरपालिका आहे, जिथे काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने निवडून आलेला आहे.अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करण ससाणे हे...
श्रीरामपूर- पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात श्रीरामपूरची नगरपालिका अशी एकमेव नगरपालिका आहे, जिथे काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने निवडून आलेला आहे.अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करण ससाणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.नऊ वर्षांपूर्वी श्रीरामपूर मध्ये चूक झाली होती,ती चूक यावेळी श्रीरामपूरकरांनी दुरुस्त केली,असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले . श्रीरामपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी काल सर्व धर्मगुरू तसेच माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, अंजूम शेख,भारती कांबळे,दत्तात्रय सानप,मुन्ना पठाण,सभापती सुधीर नवले,ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे,दिपाली ससाणे व नुतन नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार ओगले बोलत होते.आ. हेमंत ओगले पुढे म्हणाले की प्रत्येकाने निवडणूकित मोलाचे सहकार्य केले आहे.ज्यांनी समोर येऊन साथ दिली, काहींनी मागे राहून आम्हाला सहकार्य केले.निवडणुकीच्या काळामध्ये काही मतभेद किंवा मनभेद, गैरसमज झाले असतील ते सर्वजण विसरून जाऊ. आपण श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित येऊन येणारा पुढच्या पाच वर्षांमध्ये श्रीरामपूर परत एकदा स्वर्गीय जयंत ससाणे हे नगराध्यक्ष असताना जी परिस्थिती होती तशी आपण सर्वजण मिळून आणू. नूतन नगराध्यक्ष करण ससाने यावेळी म्हणाले की,आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे,श्रीरामपुरातील तमाम स्वाभिमानी जनतेच्या आणि संघटनेच्या सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व सर्व माता भगिनी यांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांच्या मदतीने आपण निवडून आलो.इथून पुढच्या आपल्या काळामध्ये आपण सगळे मतभेद विसरून श्रीरामपूरचा विकास एवढे एकमेव ध्येय समोर ठेवून, सगळ्यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचे नाव राज्यांमध्ये नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करू.आपल्याला पूर्वीचे वैभवशाली श्रीरामपूर परत निर्माण करायचे आहे.या कामी सर्वांनी पुढेही साथ द्यावी असे आवाहन ससाणे यांनी केले. याप्रसंगी सर्वधर्म गुरुंचे आशिर्वाद घेण्यात आले. ह.भ.प.वीर महाराज,शिख समाजाचे ग्यानी मिस्कीनजी, ख्रिस्ती समाजाचे फादर प्रकाश भालेराव, बौद्ध धर्मगुरु तसेच मौलानांचे संदेश नगरसेवक मुझफ्फर शेख यांनी वाचून दाखवले.तत्पूर्वी करण ससाणे यांचे नगरपालिकेजवळ आगमन होताच ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. नगरपालिका प्रांगणात प्रवेश करताच त्यांनी प्रथमतः शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.प्रशासक तथा प्रांतधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले.यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पुढील सोहळा पार पडला.कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे पक्षप्रतोद मुजफ्फर शेख यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. तर आभार नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मानले.
जनसंपर्क कार्यालय पुन्हा ‘त्याच’ ठिकाणी माजी आमदार जयंत ससाणे यांच्या काळात नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या हॉलमध्ये जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले होते.मा.नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी निवडून आल्यानंतर ते कार्यालय बंद करून तेथे पाणीपुरवठा विभागाला जागा दिली होती.मात्र काल पुन्हा एकदा त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येऊन पाणीपुरवठा विभाग दुसरीकडे हलवण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद
श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी