पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे;कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी-पोलीस उपअधीक्षक भवर

श्रीरामपूर-बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत.घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासला गती देण्यात आली...

श्रीरामपूर-
बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत.घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासला गती देण्यात आली आहे.काही व्हिडीओ फुटेज पोलिसांना तपासादरम्यान मिळाले असून त्यात आरोपी दिसत आहेत. त्यावरुन त्यांची ओळख पटवून शोध घेण्याचे काम सुरू आहे.अद्याप गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न झाली नसली तरी त्यांना अटक केल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.
शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.जहागिरदार यांना छाती व पोटात गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत असल्याने श्रीरामपूर शहरात त्यांचे समर्थक चिंतेत आहेत.त्या पार्श्वभूमीवर भवर यांनी हे आवाहन केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पुढे म्हणाले की, पोलिसांनी घटनेनंतर  तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यातील पुरावे गोळा केले.यातील तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.यात स्थानिक गुन्हे शाखेची देखील मदत घेतली जात आहे.आरोपींनी गोळीबार करताना पिस्टल वापर केलेला दिसत आहे.तपास पथकाकडून सर्व पुरावे बारकाईने गोळा करून तपासले जात आहेत जेणे करून भविष्यात देखील या गुन्ह्याच्या तपासात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात आहे.त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करून शांतता अबाधित ठेऊन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी,असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!