श्रीरामपूर नगरपालिकेत अभियंत्याची कर्मचाऱ्यास धक्काबुक्की शहर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट...

A_tense_office_confrontation_between_a_municipal_engi_2

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचऱ्यांमधील वादाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. आता तर वीज विभागातील अभियंत्याने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. संदिप वायकर या कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी मनोज मोरे या अभियंत्याविरूद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व विभागात लेखी तक्रारही पाठविण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, संदिप हौशीराम वायकर हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने डाटा ऑपरेटर म्हणून पालिकेत कार्यरत आहे. त्यांची नियुक्ती वीज विभागात करण्यात आली होती. दरम्यान गेल्या पाच महिन्यापूर्वी मनोज संजय मोरे हे वीज विभागात अभियंता म्हूणन बदलून आले. त्यांनंतर वायकर व मोरे यांच्यात अनेकदा कामावरून व इतर कारणावरून खटके उडत होते. मोरे हे मद्यपान करून कामावर येत असल्याचा आरोपही तक्रारीमध्ये केला आहे. मद्यधुंद अवस्थेत मोरे कार्यालयात वायकर यांच्यावर चिडचीड करणे, शविगाळ करणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणे वाजवणे तसेच गुलामासारखी वागणूक देत होते. शिवाय कुठलेही कारण नसताना १८ जून रोजी वायकर यांना कामावरून काढून टाकत आपल्या पत्नीला ठेकेदाराकरवी कंत्राटी पदावर नियुक्त करून घेतले.

वायकर यांनी याबाबत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी मोरे यांना समज दिली. मात्र त्यांच्या वगणुकीत कुठलाही बदल झाला नाही. उलट १९ जून रोजी वायकर कामावर आले असता. मोरे यांनी त्यांना खुर्चीतून उठण्यास व बाहेर जाण्यास सांगितले. वायकर यांनी नकार दिल्यानंतर मोरे यांनी वायकर यांना गचांडीस धरून बाहेर ढकलले. त्यांना धक्काबुककी व शिवीगाळ केली. घडला प्रकार प्रारंभी उपमुख्याधिकारी यांच्याकडे व नंतर मुख्याधिकारी यांना सांगण्यात आला. आता वाकयर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी मोरे यांच्या विरूद्ध अदलख पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

पाच महिन्यांपासून वाद…

गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. वायकर यांनी याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. काल त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती आहे. दोघांची बाजू समजावून घ्यावी लागेल.

  • मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगर परिषद श्रीरामपूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!