प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी घेतली राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक


श्रीरामपूर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी नुकतीच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीसाठी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, महसूल सहायक उत्तम रासकर, ओम खुपसे, संदीप पाळंदे, नगरपरिषदेचे लिपिक अरुण लांडे उपस्थित होते.

यावेळी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. सर्व पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडावी असे सावंत-पाटील यांनी सांगितले. त्यांनी मतदान केंद्रांवर गोंधळ टाळण्यासाठी आणि मतदारांना त्रास होऊ नये यासाठी पक्षांनी ‘बूथ लेवल एजंट’ची नेमणूक करावी असे आवाहन केले. १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या तारखेस १८ वय वर्ष पुर्ण होणारे व झालेल्या व्यक्तींना मतदार नोंदणी करता येणार आहे. प्रतिष्टीत मतदार, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, वकील, इंजिनियर, दिव्यांग आदी मतदारांची नावे मतदार यादीत तपासा. याकामी काही अडचण असल्यास तत्काळ निवडणूक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी केले.

या बैठकीला काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर स्थानिक पक्ष व आघाडीचेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. काही पक्षांनी मतदार यादीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले, ज्यावर प्रांताधिकारी यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
=======  

१) तहसीलदारांचे आवाहन
“निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया यशस्वी करूया. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा अनुभव आणि प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडू.”
– मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर
========
  २) प्रांत व तहसीलदारांचे कौतुक
लोकसभा व विधानसभा निवडणुका प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ या राम-लक्ष्मण जोडीच्या कुशल नेतृत्वाखाली निवडणूक यंत्रणेने उत्तम काम केल्यामुळे चांगल्या प्रकारे पार पडले. यावेळी कोणतीही तक्रार अथवा अडचण आली नाही. त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असे गौरव उद्गार राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News