लाडकी बहीण योजनेची केवायसी अधिकृत केंद्रातुन करा–आसने

श्रीरामपुर-राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यात अनेक...

श्रीरामपुर-
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळावा यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी ही केवायसी करताना मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून येत असून, चुकीच्या पद्धतीने केवायसी झाल्यामुळे अनेक पात्र महिलांचे अर्ज अडचणीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी केवायसी प्रक्रिया करताना फक्त अधिकृत सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा सेतू केंद्रातच केवायसी करावी, असे आवाहन भाजप सोशल मीडिया सेलचे तालुका संयोजक संदीप आसने यांनी केले आहे. आसने यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांनी वडील किंवा पती यांच्या आधारकार्डच्या माध्यमातूनच केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी वडील किंवा पती यांच्या मोबाईलवर ओटीपी येत नसल्यास, काही खाजगी एजंटांकडून महिलांना चुकीचा सल्ला देत कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार वापरण्यात येत आहे. अशा प्रकारे केलेली केवायसी नियमबाह्य ठरू शकते आणि भविष्यात महिलांचा योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता निर्माण होते.
श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खाजगी एजंटांकडून महिलांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी अपूर्ण माहिती, चुकीची कागदपत्रे, तसेच चुकीचे आधार लिंकिंग यामुळे महिलांचे अर्ज बाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, शासनमान्य केंद्रातूनच केवायसी करून घ्यावी, असेही आसने यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, सीएससी आणि सेतू केंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच केवायसी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अशा केंद्रांमध्ये केवायसी केल्यास त्रुटी राहण्याची शक्यता कमी असते. तसेच महिलांनी केवायसी करताना आपली वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, मोबाईल नंबर याबाबत दक्षता घ्यावी आणि कोणालाही अनावश्यक माहिती न देता योग्य ठिकाणीच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संदीप आसने यांनी शेवटी केले. या योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी महिलांनी सतर्क राहून अधिकृत केंद्रांचीच निवड करावी, असेही त्यांनी नमूद केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!