स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेचे चित्रीकरण करणारी हार्डडिस्क बदलली;नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसमोर प्रक्रिया पूर्ण

श्रीरामपूर-नगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतपेट्या अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तहसील कार्यालयातील हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.यावर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा...

श्रीरामपूर-
नगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतपेट्या अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तहसील कार्यालयातील हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.यावर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.आवश्यकतेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने स्ट्रॉंग रूम मधील या सुरक्षा व्यवस्थेचे चित्रीकरण केली जाणारी हार्डडिस्क पूर्ण भरत आल्याने ती काल सर्व उमेदवार,शासकीय अधिकारी व माध्यम प्रतिनिधींच्या साक्षीने बदलण्यात आली आणि नवीन हार्ड डिस्क टाकण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी,प्रकाश चित्ते,अशोक थोरे,काँग्रेस प्रतिनिधी म्हणून मुजफ्फर शेख,रवि भांबारे,निलेश भालेराव,विविध प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,निवडणूक यंत्रणेची सर्व अधिकारी कर्मचारी,पत्रकार उपस्थित होते.
तहसीलदार वाघ यांनी सांगितले की या ठिकाणी जी हार्डडिस्क बसवण्यात आली आहे ती तशी पुरेशी होती परंतु आपण आवश्यकतेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे हार्ड डिस्क ला मर्यादा आल्या व चार दिवस पुरेल एवढा डाटात्यात शिल्लक होता.परंतु पुढील दोन-चार दिवसांचा प्रश्न निर्माण होणार असल्याने नवीन हार्ड डिस्क टाकण्यात आली आहे.त्यामुळे २१ तारखेच्या मतमोजणी पर्यंत चा सर्व डाटा आता यामध्ये साठवला जाणार आहे.यावेळी सर्व उमेदवार व प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूम मधील सुरक्षा व्यवस्थेचे लाईव्ह चित्रीकरण दाखवण्यात आले.सर्वांच्या सह्या देखील यावेळी घेण्यात आल्या.बदललेली हार्ड डिस्क सुरक्षित पाकिटात ठेवून स्ट्रॉंग रूम मध्येच ठेवण्यात आली.सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही प्रक्रिया पार पडली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!