श्रीरामपूर शहराच्या मध्यभागात बिबट्यांचा वावर; खाजगी व सरकारी जागेतील झाडे झुडपे काढण्याची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुका व शहरांमध्ये बिबट्यांची संख्या ५६ असल्याचा दावा भारतीय वन्यजीव संस्थेने केला आहे. सहा महिन्यात बिबट्याची संख्या शंभरी पार करील,असे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुका व शहरांमध्ये बिबट्यांची संख्या ५६ असल्याचा दावा भारतीय वन्यजीव संस्थेने केला आहे. सहा महिन्यात बिबट्याची संख्या शंभरी पार करील,असे वाटते. सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्याने बिबटे लपण्याचे नवीन ठिकाण शोधत आहे. त्यामुळे श्रीरामपूर परिसरात बिबटे फिरताना दिसतात. शहरात म्हाडा कॉलनी, पाटनी मळा, मोरगे वस्ती, गोंधवणी परिसर तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन दररोज होत आहे. बिबटे लपण्यासाठी झाडांचे जंगल शोधत आहे, शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक भागांमध्ये खाजगी व सरकारी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर वेड्या बाभळीचे झाडे वाढली आहेत, त्यामुळे बिबटे शहरात येताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, रात्री घरासमोर अथवा रस्त्यावर खेळणारी लहान मुले यांना पालक घराच्या बाहेर जाऊ देत नाही, ऊस शेतीच्या परिसरात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ऊस क्षेत्रात पाण्याचे साठे, ऊसामुळे वास्तव्यासाठी, प्रजननासाठीची अनुकुलता आणि ऊसालगतच शिकारीसाठी शेळी, मेंढी, वासरे, कोंबड्या आदींची उपलब्धता. या सर्व प्रकारच्या अनुकुलतेमुळे बिबटे बागायती भागात स्थिरावले आहेत. बिबटे पुन्हा जंगलाकडे जातील अशी स्थिती नाही. त्यामुळे बिबटे यापुढील काळात नागरी वसाहतीत मुक्कामी राहणार असल्याने ही कायमची समस्या ठरणार आहे.
भक्ष्य शोधान्यासाठी बिबट्यांनी शहरी भागातील नागरी वसाहतीत मुक्त फिरताना दिसत आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे, स्थानिक पातळीवर काही जागरूक नागरिकांनी आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण पाटील सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी संपर्क करून भविष्यात जीवित हानी टाळण्यासाठी व बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी शहरात खाजगी व सरकारी जागेवर तयार झालेले झाडाचे जंगल त्वरित काढावे, अशी मागणी केलेली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!