महायुती व शिवप्रेमींच्या वतीने जिल्हाध्यक्ष गुजर यांचा निषेध;छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन

श्रीरामपूर-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या व शिवप्रेमींच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या व जिल्हाध्यक्ष सचीन गुजर यांनी शिवाजी...

श्रीरामपूर-
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या व शिवप्रेमींच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या व जिल्हाध्यक्ष सचीन गुजर यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने ‘शिवाजी महाराजांचा अवमान चालणार नाही’अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा. सभापती दीपक पटारे,भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,संजय फंड, संजय छल्लारे,अशोक कानडे,महेंद्र पटारे,असिफ पोपटियाया,केतन खोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी अविनाश आदिक म्हणाले की, काही समाजकंटकाकडून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जाणे हे अत्यंत संतापजनक आहे.त्या समाजकंटकांना कठोरातले कठोर शासन करावे.
निवडणूकित पराभव दिसू लागल्याने अशा घटना घडवून समाजात अशांतता पसरवण्याचा यांचा कट दिसत आहे.भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी म्हणाले की,शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचे शिवप्रेमींकडून असेच हाल होतील. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर म्हणाले की,शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन व्हावे.
मा. सभापती दीपक पटारे म्हणाले की,40 वर्षे काँग्रेसची सत्ता असतानाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न या मंडळींना सोडवता आला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटल्याने काँग्रेसच्या या लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे.त्यातूनच असे प्रकार घडवले जात आहेत.छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने झालेल्या मारहाणीचे आम्ही समर्थनच करतो.यानंतर महायुती व शिवप्रेमींच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित समाजकंटकावर तात्काळ कठोर कारवाई केली जावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!