काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचीन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण;श्रीरामपूर शहरात खळबळ

श्रीरामपूर-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज दि.२६ रोजी सकाळी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर गुजर यांचा मोबाईल फोडून...

श्रीरामपूर-
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे आज दि.२६ रोजी सकाळी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर गुजर यांचा मोबाईल फोडून टाकून त्यांना निर्जनस्थळी सोडून देण्यात आले.श्रीरामपूर शहरात बुधवारी सकाळी ही घटना घडली.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल गुजर यांनी अवमानकारक वक्तव्य केले म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे शिवप्रहार प्रतिष्ठानचे चंद्रशेखर आगे यांनी आपणच गुजर यांना मारहाण केल्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल करत मारहाणीचे समर्थन केले आहे.ऐन नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मारहाणीनंतर सचिन गुजर यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले,नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत संबंधित हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
अपहरण करण्यात आल्याची ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.सचिन गुजर नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडले होते. तेव्हा घरापासून काही अंतरावर एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले व जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेलयाचे त्यात दिसत आहे. त्यांनंतर गुजर यांना शहरापासून काही अंतरावरील रस्त्यावर निर्जन ठिकाणी सोडून देण्यात आले व त्यांचा मोबाईलही फोडून टाकण्यात आला.या मारहाणीच्या घटनेने श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!