श्रीरामपुरात सागर बेग यांच्या स्वागताने उपमुख्यमंत्री शिंदे भारावले;बेग यांच्या नेतृत्वाखाली जंगी स्वागत

श्रीरामपूर-“लाडक्या बहिनींचा लाडका भाऊ,शिंदे साहेब जिंदाबाद”च्या घोषनाबाजीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला होता.शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

श्रीरामपूर-
“लाडक्या बहिनींचा लाडका भाऊ,शिंदे साहेब जिंदाबाद”च्या घोषनाबाजीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुमून गेला होता.शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेते सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. या स्वागताने उपमुख्यमंत्री शिंदे हेही भारावून गेले.दरम्यान बेग यांच्या नेटक्या आयोजनाने सर्वांचे लक्ष वेधले गेले होते.त्यामुळे नगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने शहरात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर शहरातील श्रीराम चौकात आयोजित केलेल्या सभेसाठी काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काल शहरात आले होते.उपमुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीराने आले तरी तब्बल दीड तास त्यांच्या प्रतीक्षेत असलेले शिवसैनिक तसुभर ही कुठे हलले नाहीत. शिवसैनीकांची संख्या आणि उत्साह मोठा होता  शिवसेना नेते सागर बेग यांन सुद्धा आपल्या शिवप्रेमी शिवसैनिकां बरोबर त्याठिकाणी स्वागताच्या तयारीची पहाणी करून मार्गदर्शन केले.फटाक्यांची अतिशबाजी करण्याची तयारी सकाळपासूनच शिवसैनिकांनी करून ठेवलेली होती. गजबजलेल्या चौकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून उभे होते. पोलीस यंत्रनेला इतक्या प्रचंड गर्दीचा कोणताही ताणतणाव शिवसैनिकांमुळे पोलीसांना भासला नाही.

शिंदे यांच्या आगमनानिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दुमदुमून गेला.जेसीबीमधून फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले.या स्वागत सोहळ्यामुळे चौकाला सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.याप्रसंगी सागर बेग यांच्या सोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी व निवडणूक रिंगणात उतरलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, राष्ट्रीय श्रीराम संघांचे कार्यकर्ते,महिला आघाडी प्रमुख,युवक शिवसैनिक आणि नागरिक,मतदार या उत्साहात सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही श्रीरामपूरकरांच्या या प्रेमळ स्वागताला प्रतिसाद देत उपस्थितांना अभिवादन केले.
श्रीरामपूर शहरात झालेला हा स्वागत सोहळा दिर्घकाळ लक्षात राहील,असा भव्य आणि उत्साहपूर्ण ठरला.स्वागत सभारंभा नंतर चौकातून सभेच्या ठिकाणा पर्यंत सागर बेग यांच्यासह हजारो शिवसैनिक व उमेदवार पायी घोषणा देत गेले. सभेच्या ठिकाणी गेलेल्या या शिवसैनिकांमुळे सभा मंडप भरून गेले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!