नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना  रामगिरी महाराजांचे आशीर्वाद;महंतांचा आशीर्वाद ही माझ्यासाठी मोठी ताकद-बिहाणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिहाणी यांनी सरला बेट येथील प्रसिद्ध तपोभूमीला भेट देत महंत श्री रामगिरी महाराज...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिहाणी यांनी सरला बेट येथील प्रसिद्ध तपोभूमीला भेट देत महंत श्री रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असून धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात या भेटीची चर्चा रंगली आहे.

या भेटीदरम्यान श्रीनिवास बिहाणी यांनी विविध विकासकामांची माहिती महंत रामगिरी महाराजांना दिली. श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला संकल्प आणि कार्ययोजना सांगताना त्यांनी शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा व धार्मिक पर्यटनाच्या प्रगतीची रूपरेषा मांडली. त्यावर महंत रामगिरी महाराजांनी समाधान व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिला.महंत श्री रामगिरी महाराज म्हणाले,
“शहराच्या प्रगतीसाठी सेवा भावाने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास साधत सौहार्द, शांतता आणि एकात्मतेने कार्य करणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. श्रीनिवास बिहाणी यांना भविष्यातील कार्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत.”श्रीनिवास बिहाणी यांनी सांगितले की,
“महंतांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी ताकद आहे. श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आध्यात्मिक शक्ती आणि समाजाचा विश्वास हीच खरी प्रेरणा आहे. शहराचे सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी आम्ही आग्रही राहू.”

याप्रसंगी  नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, दत्तात्रय ढालपे,जितेंद्र छाजेड, शशीकांत रासकर, जीतेन्द्र पवार यांसह विविध सामाजिक संस्था, स्थानिक ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सरला बेट परिसरात झालेल्या या भेटीने शहरातील धार्मिक आणि राजकीय वातावरणात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.सामाजिक बांधिलकी, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही ताकद घेऊन श्रीनिवास बिहाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले असल्याने त्यांची जोरदार चर्चा आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!