शहरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करू-उपमुख्यमंत्री शिंदे;भुयारी गटार योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचेही आश्वासन
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणधारकांचा प्रश्न गंभीर आहे. या सर्व अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून शहराच्या विकासाचा रुतलेला गाडा पुन्हा पूर्ववत करू असे आश्वासन राज्याचे...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणधारकांचा प्रश्न गंभीर आहे. या सर्व अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून शहराच्या विकासाचा रुतलेला गाडा पुन्हा पूर्ववत करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले. श्रीरामपूर शहरातील श्रीराम मंदिर परिसरात आज दि.24 रोजी नगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते,मा. खा. सदाशिव लोखंडे,मा.आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,राजेंद्र झावरे, सागर बेग, बबन मुठे, अशोक उपाध्ये यांच्यासह विविध पंथांचे महाराज मंडळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ही निवडणूक श्रीरामपूर चे भविष्य घडवणारी आहे. प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी शहरातील मतदारांना मिळाली आहे.सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा प्रमुख अजेंडा आहे.श्रीरामपूर शहराचे अनेक प्रश्न प्रलंबिल आहेत.येथील रस्त्यांसाठी आपण निधी दिलेला आहे. यापुढेही तो अधिक देऊ. शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करू.इथल्या एमआयडीसीमध्ये विविध प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. मागील काळात शहरात भुयारी गटार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील दोषींना जेलमध्ये टाकू.या निवडणुकीवर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. सर्वांनी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. कुणी काही गफलत केली तर ती नक्कीच लपून राहणार नाही. कुणाशीही कसलेही साटेलोटे करू नका.दिवसभर असलेल्या सभांमुळे मला श्रीरामपूर मध्ये येण्यास बराच उशीर झाला. हेलिकॉप्टरची अडचण होती, परंतु इथे आलो नसतो तर वेगवेगळे अर्थ काढले गेले असते.त्यामुळे उशिरा का होईना पण आपल्या लाडक्या बहिनिंचा आशीर्वाद घेण्याकरिता आलो असल्याचे भावनिक उद्गार शिंदे यांनी काढले. शिवसेनेचे श्रीरामपूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यावेळी म्हणाले की,शहरातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न महत्वाचा आहे. सुमारे 2 हजार लोकांचा प्रपंच उध्वस्त झाला आहे. त्यांचे पुनर्वसन हेच आपले ध्येय आहे.शिंदे यांनी अनाथांचा नाथ एकनाथ हे वाक्य श्रीरामपूरात खरे करून दाखवले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव व देवळाली प्रवरा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवारही उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्तविक बबन मुठे यांनी केले. तर आभार अशोक उपाध्ये यांनी मानले.
‘इलाका किसिका भी हो धमाका हम ही करेंगे’ श्रीरामपूरकरांनी नगरपालिका निवडणूकित शिवसेनेचा भगवा ध्वज नगरपालिकेवर फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना करतानाच ‘इलाका किसिका भी हो, धमाका तो हम ही करेंगे’ असा हिंदी चित्रपटातील डायलॉग मारला.त्यास उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
शहरातील श्रीराम मंदिर परिसरात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.(छाया-अमोल कदम)
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी