सोयाबीन चोरी करणारी आणखी एक टोळी जेरबंद;अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची कारवाई

श्रीरामपूर-नायगाव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन चोरल्या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने धडक कारवाई करीत सापळा रचून पाच जणांना अटक...

श्रीरामपूर-
नायगाव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन चोरल्या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने धडक कारवाई करीत सापळा रचून पाच जणांना अटक केली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी आणखी एक टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.विशेष म्हणजे सोयाबीन चोरणारे हे सर्व चोरटे शेतकऱ्याच्या घराशेजारी राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, फिर्यादी गोरक्षनाथ भिमराज ढवळे, रा. नायगाव, ता. श्रीरामपुर यांनी त्यांचे शेतातील पत्र्याचे शेड मध्ये ठेवलेले एकुण १५ गोण्या अंदाजे ११ क्विटल सोयाबीन एकुण ४५,०००/- रु.किं.चे हे दि.०६/११/२०२५ रोजी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या म्हणुन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे  गु.र.नं. ४८७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सदरचा गुन्हा हा आरोपी सचिन जगन्नाथ मोरे, रा. नायगाव, ता. श्रीरामपुर याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अमंलदार यांनी सापळा रचुन आरोपी सचिन जगन्नाथ मोरे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास त्याचे साथीदाराचे नाव विचारले असता त्याने त्यांची नावे हरीदास अर्जुन निकम, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर, शुभम जालींदर मोरे, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर,तुषार अनिल सदाफुले, वय २३ वर्ष, रा.नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर,विशाल अशोक गायकवाड, वय २१ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर अशी असल्याचे सांगीतले.

त्यावरुन लागलीच उर्वरीत आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकाने सापळा रचुन वरील नमुद आरोपींना ताब्यात घेतले.सर्व आरोपी यांनी एकत्र येवुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यापैकी काही आरोपी हे फिर्यादी शेतकऱ्याच्या घराशेजारी राहणारे असुन त्यांनी प्रथमतः साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली. नंतर रात्री उशीरा आरोपी तुषार अनिल सदाफुले याचे पिकअप वाहन घेवुन येवुन शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेल्या. सदर गुन्हयातील चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाराचा तपास पथक कसोशीने शोध घेत असुन पुढील तपास पोहेकॉ परेश आगलावे हे पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, व मोबाईल सेलचे पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे, पो.हे.कॉ. परेश आगलावे यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!