बिबट्याचा कालवडीवर हल्ला;घुमनदेव येथील कांगुणे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील घूमनदेव येथील भाजप नेते भैरव कांगुणे यांच्या वस्तीवर सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बिबट्याने कालवडीवर हल्ला करून तिला ठार...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील घूमनदेव येथील भाजप नेते भैरव कांगुणे यांच्या वस्तीवर सोमवार दि.१७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बिबट्याने कालवडीवर हल्ला करून तिला ठार केले.सदर घटनेची माहिती त्यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या संपर्क कार्यालयाला केली असता पालकमंत्री यांच्या आदेशाने घुमनदेव येथे होणारा बिबट्याचा सुससूळाट त्वरित बंद करण्यासाठी सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून पिंजरे देण्याचे मान्य केले.तसेच वन अधिकारी बडे यांनी तातडीने घूमनदेव येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याप्रसंगी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.सदर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी टाकळीभान, घूमनदेव व कमालपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सदर बिबटे वन खात्याने पिंजरा लावून जेर बंद करावेत अशी मागणी होत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!