श्रीरामपूरात महायुती फिस्कटली;भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मा.खा.विखे यांचे शहरात बैठकांचे सत्र;नगरसेवकपदांसाठी ’22-12’च्या फॉर्म्युला?

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही बिनसल्याची चर्चा आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही बिनसल्याची चर्चा आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांच्या ‘मनासारखे’ घडत नसल्याने महायुतीत अखेर बिनसले आहे. शिवसेना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्व 34 जागा लढवणार असून भाजप-राष्ट्रवादी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी ’22-12′ च्या फॉर्म्युलावर एकत्र लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.मा.खा.सुजय विखे पाटील हे आज संध्याकाळी उशिरा श्रीरामपूरात दाखल झाले. त्यांची सर्व पदाधिकाऱ्यांशी उशिरापर्यंत ‘वन टू वन’ चर्चा सुरू होती.चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.


नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार आज अखेरपर्यंत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही.परंतु आज शिवसेनेकडून पक्षाचा एबी फॉर्म भाजपतुन शिवसेनेत आलेले प्रकाश चित्ते यांना देण्यात आल्याने तेच शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील,असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान महायुती करूनच निवडणूक लढवावी जेणेकरून विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते टाळता येऊ शकेल या विचाराने अखेरच्या क्षणापर्यंत भाजप-सेनाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.परंतु शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार ठरेल तो भाजपने मान्य करावा अशी अट चर्चेत ठेवण्यात आल्याने भाजपने ती मान्य केली नाही.त्यामुळे युती फिस्कटली अशी चर्चा आहे.शिवसेना आता स्वतंत्र तर भाजप-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले असून नगरसेवकपदाच्या 22 जागा भाजप तर 12 जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज फायनल झाले असून नगराध्यक्षपदाबाबत मात्र ‘सस्पेन्स’ कायम आहे.दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे.’कमळ की घड्याळ’ यापैकी कुठल्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी यावर चर्चा सुरू असल्याचे माहिती आहे.परंतु त्याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मा.खा.सुजय विखे पाटील हे आज संध्याकाळी उशिरा श्रीरामपूरात दाखल झाले. त्यांची सर्व पदाधिकाऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत वन टू वन चर्चा सुरू होती.उद्या दि.17 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून नगराध्यक्षपदासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच ते एखादा राजकीय भुकंप घडवतात का, याविषयी उत्सुकता आहे.भाजप माजी नगराध्यक्ष संजय फंड व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करते की धक्कातंत्राचा वापर करते याविषयी उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहून सुमारे 50 हजार मते मिळवून चर्चेत राहिलेले हिंदुत्ववादी नेते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याही शहरात गाठीभेटी सुरू असून त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे मोबाईलवरील बदललेले स्टेटस अत्यंत ‘बोलके’ व लक्षवेधी ठरत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!