भाजयुमोच्या माध्यमातून समाजातील तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.विखे पाटील ;भाजपा युवा मोर्चाची कार्यकारणी जाहिर

श्रीरामपूर-युवकांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्य समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पक्षवाढीचे काम करावे अशा सूचना मा.खा. डॉ.सुजय विखे...

श्रीरामपूर-
युवकांनी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्य समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पक्षवाढीचे काम करावे अशा सूचना मा.खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केल्या.डॉ. विखे पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन  करून पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असा मोलाचा सल्लाही दिला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्रीरामपूर ग्रामीण मंडलाची नवनियुक्ती कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक पटारे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे  
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.नवनियुक्त कार्यकारणीत सरचिटणीस ०४, उपाध्यक्ष्य ०९,चिटणीस ०९,सोशल मिडिया प्रमुख ०२, कोषाध्यक्ष ०१,कार्यकारणी सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे म्हणाले की, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून येणार्‍या काळात जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून भारतीय जनता पक्षाला व महायुतीला घवघवीत यश मिळवुन देण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहू.सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. रविंद्र चव्हाण,जलसंपदा मंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री रवी अनासपूरे, माजी खासदार मा. डॉ.श्री. सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!