श्रीरामपूरात महायुतीला धक्का;नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला धक्का बसला असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नगरसेवक आणि...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला धक्का बसला असून भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  पक्षाच्या नगरसेवक आणि शहराध्यक्षांनी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.नगरसेवक शामलिंग शिंदे, गटनेते राजेंद्र पवार, रईस जहागिरदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे,नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण, मर्चंट चे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, सभापती सुधीर नवले, अंजुम शेख, मुज्जफर शेख, मुन्ना पठाण, रितेश रोटे, कलीम कुरेशी ,के.सी शेळके, निलेश नागले, रज्जक पठाण , नाजिरभाई व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी मा. आ.बाळासाहेब थोरात म्हणाले की, श्रीरामपूर ची जनता स्वाभिमानी असून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. स्व. जयंतराव ससाने यांच्या कार्यकाळात श्रीरामपूर नगर परिषदेचा नावलौकिक हा राज्यात होता. मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाले. तो श्रीरामपूरसाठी सुवर्णकाळ होता परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना ते देखवले नाही. त्यांनी श्रीरामपूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीच्यावेळी श्रीरामपूरकरांनी आ.हेमंत ओगले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत त्यांना धडा शिकवला त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीत श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार हेमंत ओगले यांनी यावेळी काँग्रेस पक्षात सगळ्यांचे स्वागत केले व येणाऱ्या काळात स्व. ससाणे साहेबांन प्रमाने सर्वांना सोबत घेऊन काम करु असे सांगितले.करण ससाणे म्हणाले की, आपन सगळ्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभारी आहे येत्या काळात बरोबरीने काम करु  असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले.तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले.यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस नेते मा.आ.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अनेक नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!