श्रीरामपूरमध्ये वाहनधारकांना पोलिसांचा दणका;विना नंबरप्लेट, मॉडिफाइड सायलेन्सरवाल्या 89वाहनांवर कारवाई

श्रीरामपूर-शहरामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेट वाहने, ब्लॅक फिल्म लावण्यात...

श्रीरामपूर-
शहरामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेट वाहने, ब्लॅक फिल्म लावण्यात आलेली वाहने व मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आलेली दुचाकी वाहने यांच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली.या मोहिमेदरम्यान एकूण 89 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विना नंबर प्लेटची वाहने विविध गुन्ह्यात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावण्यावर देखील मनाई आहे. असे असतानाही काही वाहन चालक सर्वच काचांवर ब्लॅक फिल्म लावतात. आगामी निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वरील दोनही प्रकारच्या वाहनांवर अर्थात विना नंबर प्लेट वाहने व ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यामध्ये 13 चारचाकी वाहनांवर ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या मिळून आल्या. या सर्व वाहनांच्या ब्लॅक फिल्म जागेवरच काढून टाकण्यात आल्या व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आलेल्या 5 दुचाकी वाहनांवर देखील कारवाई केली. मॉडिफाइड सायलेन्सर च्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास विद्यार्थी,सिनिअर सिटीजन, तसेच जवळून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली व मूळ सायलेन्सर बदलून मगच सोडण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, श्रीरामपूर शहर, शिर्डी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी, तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडील RCP पथक यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!