श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचा आनंद-पालकमंत्री विखे पाटील

श्रीरामपूर-नितीन शेळकेगेल्या अनेक दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात व्हावा हे श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य आपल्याला...

श्रीरामपूर-नितीन शेळके
गेल्या अनेक दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात व्हावा हे श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे,अशा भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या.
शिवसेना उपनेते,राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील भाजीमंडई समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण आज थाटामाटात संपन्न झाले. या ऐतिहासिकसोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.ना.विखे पाटील पुढे म्हणाले की,शिवरायांच्या पुतळ्याच्या या अनावरण सोहळ्यासाठी श्रीरामपूरकरांची व शिवप्रेमींची ही उपस्थिती पाहता श्रीरामपूरचे नागरिक हे विकासासोबतच आहेत याची खात्री आपल्याला पटली आहे.गेल्या कित्येक दशकांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती झाल्याने आज अत्यंत समाधान वाटत असल्याचेही ना. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!