आपला कारखाना तो आपलाच कारखाना-महंत रामगिरी महाराज;’अशोक’च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ

श्रीरामपूर-आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे...

श्रीरामपूर-
आपला कारखाना तो आपलाच असतो. त्याच्या प्रगतीसाठी, तो टिकवण्यासाठी संचालक मंडळ, कामगार व सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले पाहिजे.शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार टिकवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सुरेश गलांडे, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, भाऊसाहेब कहांडळ, दिगंबर शिंदे, बाबासाहेब काळे, अशोक बँकेचे चेअरमन अॅड. सुभाष चौधरी, व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संजय छल्लारे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आपली आई ती आपलीच असते; दुसऱ्याची आई कितीही चांगली वाटत असली तरी ती आपली होऊ शकत नाही. आपली झोपडी आपली असते; दुसऱ्याचा बंगला आपल्या काय कामाचा? कोणत्याही कारखान्याचा विकास होण्यासाठी कामगार, संचालक, शेतकरी यांचे योगदान महत्वाचे असते. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो दुसऱ्यांच्या मुखात घास घालतो त्याला देव म्हणतात आणि जो दुसऱ्यांच्या तोंडातील घास काढतो त्याला दानव म्हणतात. आपण देव राहिले पाहिजे. मराठवाड्यातील अनेक कारखाने बंद पडली आहेत, अशी परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मुरकुटे म्हणाले, कारखान्याची सत्ता आपल्या ताब्यात आली तेव्हा कारखान्याची गाळप क्षमता १५०० मेट्रिक टन होती. ती २७०० पर्यंत नेली आणि आज कारखान्याची गाळप क्षमता ४२०० टनापर्यंत आहे. आज ऊस भावाचे कारण पुढे करत बाहेरील कारखान्यांना व खासगी कारखान्यांना येथे काही मंडळी ऊस पुरवठा करत आहेत. राहुरीत जाऊन तुम्ही काय परिस्थिती आहे ते पाहून यावे. यावेळी आपल्याकडून ऊस नेऊन गाळप केले. बाहेरील लोकांना तुम्ही ऊस देता, त्यांनी येथील बंधाऱ्यासाठी चिमूटभर सिमेंट तरी दिले का याचा विचार करायला पाहिजे. त्यांनी तुमच्या भागात पाणी वाढविले का, उलट लिफ्टद्वारे पाणी उचलले आहे. त्यामुळे अशोक कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे असे माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरज मुरकुटे यांनी आभार मानले

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ६९ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!