स्वागत करण्याऐवजी आत्मक्लेश करणे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण;फंड व नवले यांनी आंदोलकांना फटकारले

श्रीरामपुर-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक होत असताना त्याचे मोठ्या मनाने स्वागत करण्याऐवजी आत्मक्लेश करणारे, अनावरणाच्या कार्यक्रमाचा निषेध...

श्रीरामपुर-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक होत असताना त्याचे मोठ्या मनाने स्वागत करण्याऐवजी आत्मक्लेश करणारे, अनावरणाच्या कार्यक्रमाचा निषेध करणे हे ‘संकुचित’ मनोवृत्तीचे प्रदर्शन असून श्रीरामपूरचे राजकारण किती खालच्या थराला चालले याचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी जि.प.सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात न बसवता भाजी मंडईसमोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा आयोजित केला गेला याचा निषेध करण्यासाठी काल श्रीरामपूर नगरपालिकेच्या आवारात असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस व उबाठा शिवसेनेच्यावतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
याबाबत संजय फंड आणि शरद नवले यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एवढया मोठ्या स्मारकाला जागा पुरणे शक्य नाही, हे सर्व माहीत असून केवळ विरोध करणे हे निंदनीय आहे. वास्तविक पाहता स्वतःला हिंद म्हणवणाऱ्यांनी निषेध नोंदवणे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.

दुसऱ्या कोणी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला असता तर एकवेळेस ती बाब समजू शकतो परंतु, हिंदू म्हणवणाऱ्यांनीच महाराजांचा पुतळा उभारत असताना आत्मक्लेश करणे आणि निषेध करणे यावरून कोणत्याही गोष्टीत राजकारण करणे आणि लोकांची दिशाभूल करणे, एवढे एकच काम शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचे नेते करत आहेत.गेल्या ४० वर्षात अनेक वर्षे काँग्रेसचे मुख्यमंत्री राहीले, श्रीरामपूरचे आमदार काँग्रेसचे होते.पालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तेव्हा छत्रपतींचे स्मारक का झाले नाही? मध्यंतरी उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री झाले होते. दोनदा शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊनही श्रीरामपुरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा स्मारक का उभारता आला नाही? स्मारक करायला त्यांचे हात कोणी बांधले होते का? ज्यांनी कित्येक वर्षे महाराजांचा पुतळा गोडाऊनमध्ये ठेवला होता त्यांचे अनुयायी आत्ता निवडणुकीच्या तोंडावर आत्मक्लेश करण्याचे नाटक करत आहेत. असे आंदोलन करून स्वतःच्या बालिशबुद्धीचे प्रदर्शन ते या निमित्त करत असल्याने श्रीरामपूरची जनता अशा प्रकारे छत्रपतींच्या पुतळयाच्या अनावरणाच्या अगोदर आत्मक्लेश करून अपशकून करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असे सांगत माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी म्हटले आहे.वास्तविक पाहता गेल्या ४० वर्षापासूनचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहरात हिंदू धर्मियांच्या भावनाचा आदर होत आहे,याचे कौतुक होणे गरजेचे आहे, असेही फंड व नवले यांनी म्हटले आहे

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱ्या छत्रपतींच्या स्मारकाच्या कोनशिलेवर आ. हेमंत ओगले, मा. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची नावे टाकलेली आहेत. कोनशिलेवर ज्यांची नावे आहेत. त्यापैकी आ. ओगले आणि ससाणे यांनी काल आत्मक्लेश आंदोलन केले.याच्याइतकी श्रीरामपूरकरांसाठी शोकांतिका नाही, अशी खंत फंड आणि नवले यांनी व्यक्त केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!