आ.ओगले, ससाणे, बडदेंसह अनेकांचा आत्मक्लेष;’महाराज माफी आसावी’ म्हणत आंदोलन

श्रीरामपूर-श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजीमंडई समोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित केला आहे.त्याचा...

श्रीरामपूर-
श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा शिवाजी चौकात न बसवता भाजीमंडई समोर बसवून त्याबाबतचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित केला आहे.त्याचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बदढे यांनी आत्मक्लेष आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी शिवप्रेमीसह श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर,सभापती सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे,डॉ. वंदना मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, रमेश कोठारी, राजेंद्र सोनवणे, लकी सेठी, दिलीप नागरे, अहमदभाई जागीरदार, पंडितमामा बोंबले, अशोक उपाध्ये, समिन बागबान, तिलक डूगरवाल उपस्थित होते.यावेळी नगरपालिकेतील महाराजांच्या पुतळ्यासमोर मौन पाळत आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दोन तारखेला भाजी मंडई या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात आम्ही बसवू शकलो नाही, त्यासाठी आम्ही श्रीरामपूरकर कमी पडलो म्हणून छत्रपती शिवरायांची माफी मागून एक तारखेला सकाळी नगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माफी मागून आत्मक्लेश आंदोलन शिवसेना व शिवप्रेमी यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली. या आंदोलनात सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक व श्रीरामपुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या वेळी स्वतः परमपूज्यनीय रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी रोड या ठिकाणी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा भूमिपूजन झाले होते. मग ते काय फक्त खासदारकी पुरते होते की काय? त्यानंतर आज पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजी मंडई या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे.ते पण पूर्ण राजकीय असून जनभावनेचा जी मागणी आहे त्याला पूर्ण विरोध करून फक्त बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजी मंडई या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होत आहे.हा सर्व जनतेच्या भावनेचा खेळवाड आहे.

स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी भाजी मंडई या ठिकाणी त्याचवेळी परमिशन दिली होती पण जनभावना त्या ठिकाणी पुतळा बसवण्यास अनुकूल नव्हती त्यामुळे त्यांनी कधीही तो निर्णय जनतेवर लादला नाही सर्व गोष्टी जनतेच्या समोर याव्या आणि शिवप्रेमींना याची माहिती व्हावी म्हणूनच आम्ही सर्वांनी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.याप्रसंगी  शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन बडदे ,निखिल पवार, एकनाथ गुलदगड ,रामा सुधिर वायखिंदे,अग्रवाल,  ,राहुल रणधीर, रमेश घुले ,सागर हरके ,प्रवीण शिंदे, सुरेश बारस्कर,दिनेश पोपळघट, राधाकिसन डांगे ,मच्छिंद्र वाणी, कैलास पुजारी, अतुल शेटे, सुधीर वायखिंडे, आयज तांबोळी , रज्जाक पठाण सौ शारदाताई कदम, रूपालीताई सौदागर, सौ अनुराधाताई आहेर आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!