खडका फाटा येथील कुंटणखान्यावर छापा;३ महिलांची सुटका;हॉटेल मालकासह २ जणांना अटक;अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील एका हॉटेलमधील कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या...

श्रीरामपूर-
नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील एका हॉटेलमधील कुंटणखान्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या तीन पीडित महिलांची सुटका केली.या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालकासह दोन जणांना अटक केली असून या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनला स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दिनांक २९ रोजी सकाळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे मुलींना देहव्यापारास प्रवृत्त करुन हॉटेल लॉजिंगवर जागा उपलब्ध करुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय चालवित आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांच्या मदतीने कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.त्यानंतर पोलीस पथकाने साई लॉजिंग, खडका फाटा, नेवासा येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पो.नि. महेश पाटील यांनी एका खाजगी व्यक्तीस बोलावुन घेवुन त्यास बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.पथकाने हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील बाळासाहेब भानुदास जाधव, वय २५ वर्ष, रा.मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (हॉटेल मालक),विकास योगेश उर्फ यहुवा औताडे, वय २५ वर्ष, रा.मक्तापुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (हॉटेल मॅनेजर) यांना ताब्यात घेऊन हॉटेलची पाहणी करत हॉटेलच्या रुममध्ये २ महिला मिळून आल्या. त्या महिलांची सुटका करण्यात आली.त्यांच्या विरोधात पो.ना.संदिप दरंदले,श्रीरामपुर शहर पो.स्टे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन गुरनं ९१७/२०२५ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश पाटील, म.पो.स.ई. श्रध्दा वैदय, मपोका वर्षा कांबळे नेमणुक नेत्रासा पो.स्टे. तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण असे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!