विश्वस्तांची कृती बेकायदेशीरपणाची; श्रीरामपूर येथे सकल जैन समाजाकडून निषेध

श्रीरामपूर-एचएनडी बोर्डिंग पुणे प्रश्नासंदर्भात सकल जैन समाज श्रीरामपूरच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद...

श्रीरामपूर-
एचएनडी बोर्डिंग पुणे प्रश्नासंदर्भात सकल जैन समाज श्रीरामपूरच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागासह भगवंताचे मंदीरच काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकले असल्याचा आरोप करत या निर्णयाला सकल जैन समाजाने तीव्र विरोध करत प्रांताधिकारी कार्यालय येथे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या जागेवर ट्रस्टचे नाव पुन्हा लागेपर्यंत हा लढा चालूच राहील,असे जैन समाजबांधवांनी स्पष्ट केले.
यावेळी सकल जैन समाजाचे अनिल पांडे, दिगंबर समाज अध्यक्ष सुमित काला,स्थानिकवाशी समाजाचे अध्यक्ष रमेश लोंढा, मूर्तिपूजक समाजाचे शैलेश बाबरीया,हितेश बाबरीया, दिपक शहा, ,ब्रिजेश शहा ,विशाल धुवावीया,अमित गांधी,डॉ. सुशील गंगवाल, मयूर पांडे, कल्याण कुंकलोळ, अनिल चोरडिया, संजय कासलीवाल,गुलाबचंद झांजरी ,ऍड. सुहास चुडीवाल, पंकज पांडे, जितेंद्र कासलीवाल, प्रीतम पांडे ,अजय चुडीवाल, सुभाष चुडीवाल, निलेश पाटणी ,जितेंद्र अग्रवाल ,प्रशांत आर पाटणी, भंडारी, सुरेश झांजरी, वंदना झांजरी, श्रद्धा गंगवाल, गंगवाल,सुनीता गोधा,सोनल झांजरी,साधना चुडीवाल, विक्रांत गंगवाल , तेजस गंगवाल, मनोज पापडीवाल,विजय सोनी, सतीश गोधा, मनोज ठोळे, डॉ. जयप्रकाश गंगवाल, महावीर काला,विनित कुंकलोळ, कैलास कासलीवाल,महेंद्र पांडे,राजकुमार कासलीवाल, मनोज काला,निखिल गोधा, रोमित पाटणी, विलास चुडीवाल, सचिन चुडीवाल, पंकज पाटणी, सूचित पाटणी,अनुज चुडीवाल, निखिल कासलीवाल,संतोष पापडीवाल, डॉ.प्रशांत गंगवाल,पारस पाटणी, पंकज गोधा, उदय गोधा, सुनील बाकलीवाल,राजकुमार कासलीवाल,पाटणी,दिपक गंगवाल, सचिन सोनी, अक्षय बडजाते, शुभम पाटणी, दिनेश बडजाते आदि उपस्थित होते.यावेळी अनिल पांडे म्हणाले ट्रस्टला दान केलेले जागा विकता येत नाही हे कुठल्याही धर्मात लिहिलेले नाही विश्वस्तांनी परस्पर ही जागा विकली आहे.गोखले बिल्डर यांनी जागेचा व्यवहार थांबत असल्याची ई-मेल केला असला तरी ही जागा ट्रस्टचे परत नाव लागेपर्यंत हा लढा चालूच राहील अनिल पांडे यांनी सांगितले. यावेळी प्रास्तविक राजू पाटणी यांनी केले तर आभार सुमित काला यांनी मानले.यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!