काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर;जिल्ह्यात पक्षाला नवी उभारी देण्याचे आव्हान

श्रीरामपूर-काँग्रेसच्या अहिल्यानगर ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबाबतचे पत्र माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

श्रीरामपूर-
काँग्रेसच्या अहिल्यानगर ग्रामीण प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सचिन गुजर यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबाबतचे पत्र माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.श्रीरामपूर तालुक्याला पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाला असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये पक्षाला नवी उभारी मिळवून देण्याचे मोठे आव्हान नूतन जिल्हाध्यक्ष गुजर यांच्यापुढे असणार आहे.सचिन गुजर हे गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत.त्यामध्ये त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तेरा वर्ष तर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सात वर्ष काम पाहिले ते गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.गुजर यांनी सहकार क्षेत्रात देखील काम केलेले आहे त्यामध्ये मुळा प्रवरा वीज संस्थेचे व्हाईस चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, सभापती अशोक कारखान्याचे संचालक, गणेशखिंड देवस्थानचे विश्वस्त व गुजरवाडी येथील हनुमान गडाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जगप्रसिद्ध असलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. विशेषतः श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भानुदास मुरकुटे, जयंतराव ससाने, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, आमदार हेमंत ओगले यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विशेष मेहनत घेतली व या सगळ्याच निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवून काम करणारा नेता म्हणजे सचिन गुजर अशी त्यांची ओळख आहे. स्व. जयंत ससाणे आणि त्यानंतर युवा नेते करण ससाणे यांच्या खांद्याला खांदा लावून ते श्रीरामपूर मध्ये काम करत आहे. त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे.सचिन गुजर यांची माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत ओगले, युवा नेते करण ससाने, जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष दिप चव्हाण, प्रभावती ताई घोगरे, लताताई डांगे, प्रतापराव शेळके, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, संपतराव मस्के, यांच्यासह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!