श्रीरामपूरात आता ‘सब कुछ विखे पाटील’;मा. खा.सुजय विखेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग

श्रीरामपूर-नितीन शेळकेस्थानिक स्वराज्य संस्था आणि श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मा.खा.सुजय विखे पाटील यांनी नुकतीच...

श्रीरामपूर-नितीन शेळके
स्थानिक स्वराज्य संस्था आणि श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मा.खा.सुजय विखे पाटील यांनी नुकतीच श्रीरामपूर शहरात दिवसभर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यात आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच नगरसेवकपदांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.त्यानंतर पत्रकार परिषद घेवून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली आगामी निवडणूक काळातील भूमिका स्पष्ट केली.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण 2 नोव्हेंबर रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून त्यांनी इथून पुढच्या काळात श्रीरामपूर शहरासह तालुक्याच्या विकासाचा चेहरा हा विखे पाटील हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.स्व.जयंतराव ससाणे यांच्यानंतर श्रीरामपूरचा विकास करू शकेल असे खमके नेतृत्वच इथे तयार झाले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्रीरामपूरच्या विकासाची ती पोकळी आता आपण भरून काढणार असून येत्या वर्षभराच्या काळात श्रीरामपूर शहरात फोफावलेली गुन्हेगारीही मुळासकट साफ करू,असा शब्द त्यांनी यावेळी दिला. शिर्डीनंतर आता श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा नायनाट आपण करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.त्याचवेळी शहरासह तालुक्यातील मतदारांनी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करावे,असे आवाहनही त्यांनी केले.याबरोबरच ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना भाजप पक्षात चांगले भविष्य आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायला नको,असे राजकीय भाकीत वर्तवून विखे पाटील यांनी मोठी खळबळ उडवून दिली.त्यांच्या या भाकितानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या मनात चलबिचल निर्माण झाली.भाजपातील नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांना लागलीच या संभाव्य भूकंपाचे धक्के जाणवायला लागले.एकनिष्ठ विखे समर्थक कार्यकर्त्यांनाही याबाबत कुठलाच अंदाज दिसून येत नाही.काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपात घेऊन याअगोदरच विखे पाटील यांनी काँग्रेसला खिंडार पाडलेले असताना आता नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर आणखी कुणाला भाजपात प्रवेश देऊन ते राजकीय भूकंप घडवू पाहत आहेत,याविषयी त्यामुळेच उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान यावेळी सुजय विखे पाटील यांनी निवडणूका ह्या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असून विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते आता होणार नाही,हेही त्यांनी ठासून सांगितले.त्याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेमधील नेमक्या कोणत्या नेत्याबरोबर युतीची बोलणी करायची हे आपल्याला दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावे असा चिमटाही विखे पाटील यांनी त्या दोन्ही पक्षातील सध्याचे स्थानिक राजकिय संदर्भ देत काढला.श्रीरामपूर शहराची पुढील पाच वर्षांचे विकासकामे नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहेत.आगामी २५ वर्षांचे शहर उभे करण्याचा मानस आहे.अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन, उपनगर विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याला प्राधान्य देणार असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.दरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक विखे पाटील यांच्या घरातील व्यक्ती लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर ‘विखे पाटील हेच श्रीरामपूरच्या विकासाचा चेहरा’ या मा.खा.सुजय विखे पाटील यांच्या वाक्यानेच आता त्या चर्चेचा समारोप होतो का,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!