श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला तात्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये सध्या केवळ एक दिवसपुरेल एवढा पाणीसाठा उरला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण होते. वाढत्या उष्णतेमुळे व पावसाअभावी तलावातील जलसाठा कमी होत गेला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
ही स्थिती लक्षात घेता, भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईतील रॉयलस्टोन निवासस्थानी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन श्रीरामपूरसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात भाजपा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बंडूकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या मागणीची गांभीर्याने दखल घेत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी थेट संपर्क साधून श्रीरामपूरला तत्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे श्रीरामपूरकर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शिष्टमंडळाने वेळेवर केलेली ही भेट अत्यंत परिणामकारक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, जनतेच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने कृती घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शहरामध्ये मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. तलावातील जलसाठा संपत चालल्याने संभाव्य आरोग्यविषयक आणि नागरी अडचणी लक्षात घेता भाजपने हा पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शासन दरबारी एकसंघ स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना, श्रीरामपूर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघाला असून, यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटणार नसून, भविष्यातील गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित झाली आहे. शासन व स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयातून आगामी काळात स्थायी स्वरूपाचा पाणीपुरवठा आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा मंत्र्यांकडून श्रीरामपूरला तात्काळ पाणीपुरवठ्याचे आदेश

संबंधित बातम्या
भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी
श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात
कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण
श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक
साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी
श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी
लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात
श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड
श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी
अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा
श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती
Latest News
Trending News




