आता उडणार धुरळा;श्रीरामपूरातील गट व गणांचे आरक्षण जाहीर;नव्या राजकीय समीकरणांची नांदी

श्रीरामपूर-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्यानिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील चार गट व आठ गणांचे आरक्षण व लोकसंख्या विवरणपत्र जाहीर झाले...

श्रीरामपूर-
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील चार गट व आठ गणांचे आरक्षण व लोकसंख्या विवरणपत्र जाहीर झाले आहे.गावगाड्याच्या राजकारणावर प्रभुत्व गाजवण्याची इर्षेने सर्वपक्षीय राजकीय धुरंधरांमध्ये आता धुरळा उडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नवीन आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणे दिसून आल्यास नवल वाटू नये.
तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ९८ हजार २१८ असून, त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ३८ हजार ७७४ (१९.५६ टक्के) व अनुसूचित जमातींची लोकसंख्या १७ हजार ५८३ (८.८७ टक्के) आहे. या आधारे आठ गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.निमगाव खैरी गण (क्र. ५१) – सर्वसाधारण (जनरल)-या गणात ११ ग्रामपंचायतींचा समावेश असून लोकसंख्या २३,८०९ आहे.हा गण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.उंदीरगाव गण (क्र. ५२) – अनुसूचित जाती- ८ ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या गणाची लोकसंख्या २५,८५६ इतकी आहे.
टाकळीभान गण (क्र. ५३) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-या गणात ४ ग्रामपंचायती आहेत. लोकसंख्या २६,२२४ असून मागास प्रवर्गातील महिलेसाठी हा गण राखीव आहे.निपाणी-वडगाव गण (क्र. ५४) – सर्वसाधारण महिला-या गणाची लोकसंख्या २२,९१४ असून हा गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात झाला आहे.दत्तनगर गण (क्र. ५५) – अनुसूचित जाती महिला-५ ग्रामपंचायती असलेल्या या गणात लोकसंख्या २४,२५३ आहे.अनुसूचित जातीतील महिलांना स्थानिक स्वराज्यात संधी देण्यासाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. हा तालुक्यातील सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्या असलेला गण ठरला आहे.उक्कलगाव गण (क्र. ५६) – नागरिकांचा मागास प्रवर्ग-८ ग्रामपंचायती व ९ गावे असलेल्या या गणात लोकसंख्या २४,०४६ असून हा गण मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
बेलापूर बु. गण (क्र. ५७) – सर्वसाधारण महिला-
३ ग्रामपंचायती व ५ गावे या गणात आहेत. लोकसंख्या २४,७४९ असून या भागात महिलांचे शैक्षणिक प्रमाण जास्त असल्याने निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये तीव्र चुरस अपेक्षित आहे.पढेगाव गण (क्र. ५८) – अनुसूचित जमाती-१० ग्रामपंचायती असलेल्या या गणाची लोकसंख्या २६,३६७ असून हा तालुक्यातील सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेला गण आहे.
या वितरणावरून दोन गण अनुसूचित जातींसाठी, एक गण अनुसूचित जमातींसाठी, दोन गण मागास प्रवर्गासाठी आणि तीन गण सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आहेत.या गटाचे आरक्षण पुढीलप्रमाणे-
दत्तनगर – अनुसूचित जाती पुरुष
उंदीरगाव – अनुसूचित जाती महिला,
बेलापूर – अनुसूचित जाती महिला,
टाकळीभान – सर्वसाधारण महिला.
या आरक्षणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. विविध पक्षांनी गणनिहाय उमेदवारांची छाननी सुरू केली असून, काही ठिकाणी स्थानिक गटबाजी डोके वर काढताना दिसणार आहे.दरम्यान, या घोषणेमुळे श्रीरामपूर तालुक्यातील निवडणूक वातावरण तापणार असून तालुक्यातील ग्रामीण भागाचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!