शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवरील ‘होल्ड’ काढून शासन मदत मिळू द्या;हरिहर फाउंडेशनचे तहसीलदारांना निवेदन

श्रीरामपूर-दुष्काळ आणि पीक नुकसानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज खाते व्याज न भरल्यामुळे होल्ड किंवा लिंक ठेवण्यात...

श्रीरामपूर-
दुष्काळ आणि पीक नुकसानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज खाते व्याज न भरल्यामुळे होल्ड किंवा लिंक ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शासनाकडून येणारी दुष्काळ सहाय्यता आणि पीकविमा रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर बँकांमध्ये व्याज वेळेवर न भरल्यामुळे त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळते.या कठीण परिस्थितीत श्री हरिहर फाउंडेशन, बेलापूर ने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड/लीन त्वरित मुक्त करावेत, जेणेकरून शासनाकडून येणारी मदत रक्कम शेतकऱ्यांपर्यंत अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल आणि आर्थिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात हरिहर फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम नाईक व सहकारी भगवानराव सोनवणे, विजयराव कुर्हे, विजयराव शेलार, मधुकर ठोंबरे, सुरेश जाधव, अमन सय्यद, ओम कुमावत, रवींद्र अमोलिक, इमाम पठाण, सचिन पवार उपस्थित होते. फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!