व्यक्तिद्वेष करणाऱ्यांना काय उत्तर देणार?;जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला हाकेंचा समाचार

श्रीरामपूर-त्यांना काय टिका करायची ते करु द्या,अस वक्‍तव्‍य करणारे नेतृत्‍व आपल्‍याला पाहीजे का? याचा ओबीसी समाजबांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्‍ही व्‍यक्तिव्‍देशच करणार असाल...

श्रीरामपूर-
त्यांना काय टिका करायची ते करु द्या,अस वक्‍तव्‍य करणारे नेतृत्‍व आपल्‍याला पाहीजे का? याचा ओबीसी समाजबांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्‍ही व्‍यक्तिव्‍देशच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्‍तर नाही, अशा शब्‍दात जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लक्ष्‍मण हाके यांचे नाव न घेता त्‍यांचा समाचार घेतला.
ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,कोणतही आंदोलन करताना मागण्‍यांची भूमिका मांडणे गरजेची असते.ओबीसी आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्‍पष्‍ट होती. मात्र काही नेत्‍यांकडून केवळ बागुलबूवा करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. गॅझेट मधील नोंदी १९६७ सालापासून आहेत. दाखला मिळण्‍यासाठी शासनाने कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. मात्र काही व्‍यक्‍तिंनी प्रसिध्‍दीसाठी वक्‍तव्‍य करताना भान ठेवले नाही. सामाजिक सलोखा बिघडविण्‍याचाच त्‍यांचा प्रयत्‍न दिसत असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.
आरक्षणाच्‍या बाबतीत याचिका न्‍यायप्रविष्‍ठ असताना न्‍यायालया बाहेर काही लोकं मुक्‍ताफळ उधळीत असतील तर त्‍याला आपण काय उत्‍तर देणार, अशा टिका झाल्‍यावर वेदना होतातच, आमचे देखील अनेकांशी तात्‍वीक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्‍ही कधी वापरल्‍या नाहीत. मराठवाड्यात उबाठा गटाच्या उध्‍दव ठाकरे यांनी काढलेल्‍या मोर्चावर टिका करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍यांच्‍याकडे आता हंबरडा फोडण्‍याशिवाय काहीच राहीलेले नाही. शासनाने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतक-यांना नियम बदलून मर्यादा वाढवून दिली आहे. आता फक्‍त निवडणूका जवळ आल्‍यामुळेच त्‍यांचे हंबरडा फोडण्‍याचे काम सुरु झाले आहे. सरकारला काम करु द्याव असं आवाहन ना.विखे पाटील यांनी केले.अहिल्‍यानगर जिल्‍ह्याच्‍या नामकरणा वरुन कोणी काही वक्‍तव्‍य  करीत असेल तर ते आम्‍हाला मान्‍य नाही. येथे येवून कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्‍ही निश्चित कारवाई करु. जिल्‍ह्याचे नाव का बदलले हे विचारण्‍याचा आधिकार आता त्‍यांना नाही अशी स्‍पष्‍ट  भूमिका ना.विखे पाटील यांनी मांडली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!