रात्रीतून शेड टाकून केलेले अतिक्रमण उध्वस्त; नगरपरिषद अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

श्रीरामपूर-महात्मा गांधी चौकासमोरील एका चपलांच्या दुकानासमोर रात्रीतून शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबतची माहिती नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी किरण सावंत पाटील...

श्रीरामपूर-
महात्मा गांधी चौकासमोरील एका चपलांच्या दुकानासमोर रात्रीतून शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबतची माहिती नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना मिळाल्यानंतर तात्काळ ते अतिक्रमण काढण्यात आले.महात्मा गांधी चौकासमोरील चपलांच्या दुकानासमोर रात्रीतून शेड करण्यात आले.आज शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता त्वरित नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत ते अतिक्रमण केलेले शेड काढण्यात आले. नगर अभियंता सूर्यकांत गवळी, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय शेळके, प्रशांत जगधने, राम शेळके, सिद्धार्थ साळवे, किशोर कांबळे, रामदास ढोकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईची मोहीम मंदावली असली तरी नव्याने होणाऱ्या अतिक्रमणाकडे नगरपरिषदेचे बारकाईने लक्ष असल्याचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.महात्मा गांधी चौकासमोरील पालिकेच्या गाळाधारकांनी रात्रीतून शेड उभारण्यात आले.याची गंभीर दखल घेऊन शेड काढण्यात आले.तसेच नागरिकांनी व्यापारी यांनी नव्याने अतिक्रमण करू नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.

अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत दुकानासमोरचे शेड काढले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!