श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे.आज दि.८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीरामपूर येथे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली.नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उप मुख्यधिकारी महेंद्र ताकपिरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.या नवीन प्रभागनिहाय आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य आता निश्चित झाले आहे.शहरातील राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणावर बदलली गेली आहेत.अनेक प्रभागात काही इच्छुकांच्या मनासारखेच आरक्षण निघाल्याने त्यांना आनंदाचे भरते आले. त्यांनी आतापासूनच निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर ज्यांच्या प्रभागात मनासारखे आरक्षण निघाले नाही त्यांनी ‘पुढच्या वेळी’ असे म्हणत आपल्या मनाची समजूत घातली आहे.प्रभाग निहाय आरक्षण सोडत झाल्याने आता नगरपरिषद निवडणूक प्रकियेला वेग आला असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे.
आरक्षण सोडतवेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी,मनसे, आरपीआय या प्रमुख पक्षांसह अन्य छोटे मोठे पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वीच नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटातील व्यक्ती साठी खुले झाले आहे.आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत निघाल्याने नगरसेवकपदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे..
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे-
प्रभाग क्रमांक 1 अ – ओबीसी पुरुष – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 2 अ – अनुसूचित जाती महिला ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 3 अ – अनुसूचित महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 4 अ – ओबीसी पुरुष – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 5 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 6 अ – ओबीसी – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 7 अ – अनुसूचित जाती – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 8 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9 अ – ओबीसी – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 10 अ – अनुसूचित महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 12 अ – अनुसूचित जाती – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 13 अ – सर्वसाधारण ब – अनुसूचित जमाती महिला
प्रभाग क्रमांक 14 अ – अनुसूचित जाती – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 15 अ – सर्वसाधारण – ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 16 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 17 अ – ओबीसी महिला – ब – सर्वसाधारण
