श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी खुले;तालुक्यावरील वर्चस्वासाठी मातब्बरांमध्ये रस्सीखेच

श्रीरामपूर-श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले आहे.नगरपरिषद पाठोपाठ आता पंचायत समितीचे सभापती पदही खुले झाल्याने सर्वच पक्षाच्या नेते...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले आहे.नगरपरिषद पाठोपाठ आता पंचायत समितीचे सभापती पदही खुले झाल्याने सर्वच पक्षाच्या नेते मंडळींच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यामुळे तालुक्यावरील वर्चस्व सिध्द करण्यासाठी सभापतीपदाच्या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे.
काल मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद खुले झाले आहे. २०१६ नंतर हे पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापितांची प्रतिक्षा संपली आहे.सभापतीपद २०१६ ला सर्वसाधारण खुले, २०१८ ला ओबीसी (महिला) साठी आरक्षित झाले होते.आता सर्व आरक्षणे नव्याने काढण्याचा निर्णय झाल्याने हे पद खुले झाले आहे.सभापतीपदासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे कट्टर समर्थक माजी सभापती दीपक पटारे, काँग्रेसकडून सचिन गुजर,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,मा. सभापती वंदना मुरकुटे यांच्यासह अनेकजण उत्सुक आहेत.२०१६ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकित अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसचे चार तर विकास आघाडीचे चार सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सभापती व उपसभापती पद हे अडीच-अडीच वर्षासाठी वाटून घेण्यात आले होते.आता राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली आहे.आता पालकमंत्री विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.काँग्रेस आ. हेमंत ओगले व करण ससाणे,शिवसेना मा. आ. भानुदास मुरकुटे तर राष्ट्रवादी अविनाश आदिक व मा. आ. लहुजी कानडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरेल असे सध्याचे चित्र आहे.दरम्यान सोमवारी निघणार्‍या जि.प. गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडतीकडेही तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. या आरक्षण सोडतीनंतरच पंचायत समिती निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!