अवैध धंद्यावर नऊ ठिकाणी छापे;४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

श्रीरामपूर-संगमनेर शहर, मिरजगाव, लोणी परिसरात पोलिसांनी अवैध धंद्यावर नऊ ठिकाणी छापे घालत ४ लाख २५ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त...

श्रीरामपूर-
संगमनेर शहर, मिरजगाव, लोणी परिसरात पोलिसांनी अवैध धंद्यावर नऊ ठिकाणी छापे घालत ४ लाख २५ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक कारवाई करणेकामी रवाना केले होते. कारवाई दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी लोणीला अवैध मावा विक्री करणाऱ्यांविरूद्ध तर दि. १ ऑक्टोबर रोजी संगमनेर शहरात विनापरवाना दारुची वाहतुक करणाऱ्या व जुगार खेळणाऱ्यांविरुध्द तसेच मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मावा विक्री करणाऱ्या अशा एकुण १२ आरोपीविरुध्द कारवाई करुन ९ गुन्हे दाखल केले. त्यांचेकडुन ४ लाख २५ हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी सदू जगन्ना मोरे, रा. जवळेकडलग, ता. संगमनेर, वेदांत वाईन शॉप, नाशिक रोडचे चालक/मालक, रामनाथ चांगदे शिरसाठ, रा. माधवनगर, ढोलेवाडी, संगमनेर, उमेश आनंदा सदा, रा. बिहार, वेदांत वाईन शॉप, नाशिक रोडचे चालक/मालक, संतोष अजुन खरात, रा. घुलेवाडी, संगमनेर, पुरूषोत्तम केशव धात्रक, रा. अशोक चौक, संगमनेर, अर्जुन रूपचंद पवार, रा. नवघर गल्ली, संगमनेर, स्वप्निल उर्फ सागर हनुमंत गोरे, रा. गोरेमळा, मिरजगाव, ता. कर्जत, सतिष रावसाहेब जमादार, रा. गोंदीं, मिरजगाव, ता. कर्जत, शाहरूख ऐनोद्दीन पठाण, रा.स्वामी समर्थ नगर, कोल्हार, ता. राहाता, वसिम रज्जाक शेख, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी अशा १२ आरोपींवर कारवाई करत ४ लाख २५ हजार ६६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!